माणुसकी; वानराच्या अपघाती मृत्यूनंतर गावकºयांनी केले अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 10:22 AM2019-02-27T10:22:16+5:302019-02-27T10:23:55+5:30
लऊळ : एरव्ही अपघातानंतर मदतीसाठी न थांबता आपल्या कामाला लागणाºया धावपळीच्या जमान्यात माढा तालुक्यातील लऊळ येथील गावकºयांनी अपघातामध्ये मृत ...
लऊळ : एरव्ही अपघातानंतर मदतीसाठी न थांबता आपल्या कामाला लागणाºया धावपळीच्या जमान्यात माढा तालुक्यातील लऊळ येथील गावकºयांनी अपघातामध्ये मृत झालेल्या वानरावर अंत्यसंस्कार केले. एवढेच नाही तर त्याचा तिसरा दिवसही पाळला. माणसांएवढेच मुक्या प्राण्यांवरही प्रेम करणाºया या गावकºयांच्या संवेदना चर्चेच्या ठरल्या आहेत.
रविवारी एका अज्ञात वाहनाच्या अपघातात सकाळी ८:१५ वाजण्याच्या सुमारास उजनी रस्त्यावर वडाचामळा येथे एका वानराचा मृत्यू झाला. त्याला गावातील गणेश लोकरे यांनी पाहिले. ही माहिती त्यांनी गावकºयांना सांगितली. हा हा म्हणता गावभर ही वार्ता पसरली. अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. वानरावर माणसाप्रमाणे अंत्यसंस्कार विधी करण्याचे सर्वानुमते ठरले. त्यानुसार वडाचामळा येथील वस्तीवर रस्तालगत धार्मिक पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी तिसºया दिवसाचा विधीही धार्मिक पध्दतीने करण्यात आला. एवढेच नाही तर वानराच्या दहाव्याचाही धार्मिक विधी करण्याचा निर्णय गावकºयांनी घेतला आहे.
वानरावर अंत्यसंस्कार व तिसºयाचा धार्मिक विधी हनुमान मंदिराचे पुजारी चंद्रकांत कोळी यांनी पार पाडला.
यावेळी सयाजी लोकरे, राजेंद्र लोकरे, गणेश लोकरे, किसन लोकरे, दरलिंग लोकरे, बंडू लोकरे, भाऊ लोकरे , ज्ञानेश्वर लोकरे, राम, डॉ.शिवाजी नलवडे, बबन बोडके, कुलदीप लोकरे, रामहरी व्यवहारे, बाबू लोकरे, औदुंबर लोकरे, प्रवीण लोकरे, धनाजी जोशी, अर्जुन व्यवहारे, भाऊराव नलवडे आदींसह गावकरी आणि महिला उपस्थित होत्या.
दोन वानरांचीही उपस्थिती
- वडाचामळा येथे मृत वानरावर अंत्यसंस्कार होताना दोन वानर उपस्थित असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. बहुधा मृत वानर त्या दोन वानरांच्या कळपातील असावे, असा सर्वांचा अंदाज आहे. माणसांसारखं मुक्या प्राण्यांनाही भावना असतात, याची प्रचिती या घटनेच्या निमित्ताने सर्वांना आली.