करमाळ्यात खाकी वर्दीची माणुसकी; परप्रांतीय चालकांना अल्पोपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:20 AM2021-05-17T04:20:37+5:302021-05-17T04:20:37+5:30

करमाळा शहराजवळून जाणाऱ्या टेंभुर्णी- अहमदनगर राज्यमार्गावरून रोज मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मालवाहतूक होते. दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश असा ...

The humanity of khaki uniforms in Karmala; Snacks to foreign drivers | करमाळ्यात खाकी वर्दीची माणुसकी; परप्रांतीय चालकांना अल्पोपहार

करमाळ्यात खाकी वर्दीची माणुसकी; परप्रांतीय चालकांना अल्पोपहार

Next

करमाळा शहराजवळून जाणाऱ्या टेंभुर्णी- अहमदनगर राज्यमार्गावरून रोज मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मालवाहतूक होते. दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश असा दक्षिणोत्तर राज्यांना जोडणारा हा महामार्ग आहे. लॉकडाऊनमुळे सध्या रस्त्याने सर्व हॉटेल बंद आहेत. अशा स्थितीत चालकांची चहा, नास्ता व जेवणाची गैरसोय होते. हीच अडचण ओळखून करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी मालवाहतूक करणाऱ्या चालकांना अल्पोपहार दिला. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत आहे. सरकारने केलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. हे करत असतानाच माणुसकी धर्म जपत करमाळा पोलिसांनी चालकांना नास्ता देत आदर्श निर्माण केला आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलिसांनी मालवाहतूक करणाऱ्या चालकांना करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकणे यांच्या हस्ते नास्ता दिला. करमाळा पोलीस स्टेशनमधील पोलीस व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

---

फोटो १६ करमाळा पोलीस

Web Title: The humanity of khaki uniforms in Karmala; Snacks to foreign drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.