पंढरपुरातील स्वच्छतेसाठी दीड कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 05:06 AM2018-04-05T05:06:15+5:302018-04-05T05:06:15+5:30
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पंढरपुरातील मंदिर प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, पालखी प्रदक्षिणा मार्ग व दर्शन मंडप आदी परिसराची स्वच्छता करण्यासाठी वर्षाला १ कोटी ४९ लाख ३६ हजार रुपये खर्च करण्यात येतील.
पंढरपूर (जि. सोलापूर) - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पंढरपुरातील मंदिर प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, पालखी प्रदक्षिणा मार्ग व दर्शन मंडप आदी परिसराची स्वच्छता करण्यासाठी वर्षाला १ कोटी ४९ लाख ३६ हजार रुपये खर्च करण्यात येतील.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून रोज हजारो भाविक पंढरीत येतात़ मंदिर परिसर स्वच्छ असावा, अशी भाविकांची इच्छा होती़ मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनीही यासंदर्भात पावले उचलली होती. ई-निविदा प्रक्रिया राबवून पुण्यातील मे़ बीएसए कॉर्पोरेशन लि़ यांना या कामाचा ठेका मिळाला आहे़ १०२ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून १५ एप्रिलपासून अद्ययावत यंत्रसामग्रीद्वारे तीन शिफ्टमध्ये हे काम केले जाणार आहे. सिंगल डिस्क स्क्रबर, हाय पे्रशन जेट, वेट अॅण्ड ड्राय व्हॅक्यूम क्लिनर, स्क्रबल ड्रायर, गारबेज ट्रॉली, विंगर ट्रॉली, ग्लास क्निनिंग किट, टेलिस्कोपिक पोल, सेप्टी लॅडर अशा अद्ययावत यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येणार आहे़ या स्वच्छता कामाच्या संनियंत्रण व मूल्यमापनासाठी मंदिर समिती सदस्य व कार्यकारी अधिकारी हे स्वत: लक्ष देणार आहेत़ कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी मंदिर परिसरातील व्यापाºयांची बैठक घेतली़
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची स्वच्छता करणे हे नित्याचे आणि व्यापक स्वरूपाचे काम आहे़ भाविक, व्यापारी, स्थानिक नागरिक, संस्था, स्थानिक प्रशासन या सर्वांचे सहकार्य व सहभाग आवश्यक आहे़
- सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी, मंदिर समिती, पंढरपूर