सोलापुरातील शेकडो बेरोजगारांना मिळणार रोजगार; ते कसे ? वाचा सविस्तर
By Appasaheb.patil | Published: September 22, 2022 06:31 PM2022-09-22T18:31:13+5:302022-09-22T18:31:17+5:30
सोलापूर : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, सोलापूर आणि साई समर्थ विद्या विकास संस्था व अहिल्याबाई प्रशाला व ...
सोलापूर : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, सोलापूर आणि साई समर्थ विद्या विकास संस्था व अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय (अल्पसंख्याक विशेष) रोजगार मेळाव्यात 137 उमेदवारांना रोजगार मिळाल्याची माहिती सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाने दिली आहे.
मेळाव्यासाठी औद्योगिक परिसरातील एकूण १० नामांकित उद्योजकांनी ४०० पेक्षा जास्त रिक्तपदासाठी सहभाग नोंदविलेला होता. रिक्तपदे किमान १० वी, १२ वी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, जीएनएम, बी.एस.सी, स्टाप नर्स, बी.फार्म, एम.फार्म, एम.बी.ए. केमिस्ट इत्यादी विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी होती. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या होत्या. रोजगार मेळाव्यात ३०९ नोकरी इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदविला. त्यामधून एकूण १० उद्योजकांमार्फत प्रत्यक्ष मुलाखतींद्वारे १३७ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.