सोलापूर जिल्ह्यातील या गावात होतेय दररोज शेकडो पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 12:17 PM2020-08-26T12:17:51+5:302020-08-26T12:24:28+5:30
रंगीबेरंगी वनस्पतींच्या हिरवाईने नटलेले डोंगऱ़़ नागमोड्या वाटा़़़ खळाळणारे पाण्यांनी वेधले लक्ष
माळशिरस : रंगीबेरंगी वनस्पतींच्या हिरवाईने नटलेले डोंगऱ़़ नागमोड्या वाटा़़़ खळाळणारे पाणी़़़ झाडाझुडपांनी वेढलेला परिसऱ़़ असे विहंगम दृश्य डोळ्यांसमोर आले की कोकणाची आठवण येते़ आता दुष्काळी भांब (ता़ माळशिरस) परिसरातही सततच्या पावसामुळे येथे येणाºया पर्यटकांनाही कोकणची आठवण होताना दिसत आहे.
भांब येथील संभाजी बाबा दरा सध्या अनेक दिवस रेंगाळलेल्या पावसामुळे पर्यटकांना भुरळ घालत आहे. दुष्काळी पट्ट्यातील दुर्गम समजल्या जाणाºया या गावात रस्ते, पाणी, बेरोजगारी, स्थलांतर अशा अनेक अडचणी होत्या़ मात्र यावर्षी निसर्गाने गावचा परिसर बदलवून टाकला आहे. त्यामुळे ट्रेकिंग, देवदर्शन, भ्रमंती करणारी मंडळी या दराकडे आकर्षित होताना दिसत आहेत.
शिखर शिंगणापूर डोंगर रांगेच्या पायथ्याला आणि सोलापूर, सातारा जिल्ह्याच्या सीमेवर भांब गाव वसलेले आहे़ या गावाजवळील दरीत शंभू महादेव, संभाजी बाबांचे मंदिर व पुढे डोंगरातून वाट काढत दोन किलोमीटर अंतरावर असलेले वाघजाई देवीचे मंदिर हे पर्यटकांना आकर्षित करीत आहे. या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही़ पुढे वाघजाई देवी दर्शनाला दºयातून पायवाटेने प्रवास करावा लागतो़
तिन्ही बाजूंनी डोंगर अन् एकाच रस्त्याने मार्ग
या ठिकाणाचे भौगोलिक वैशिष्ट्य असे की, या गावच्या तिन्ही बाजूंना भलेमोठी डोंगरं आहेत़ केवळ एकाच बाजूला रस्ता आहे़ या ठिकाणी पुरातन बांधकामाचे काही अवशेष मिळून येतात. मराठा सरदार संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांची छावणी या ठिकाणी होती, असे सांगितले जाते़ त्यानंतर पुढे शंकराचे भक्त संभाजी बाबा याच ठिकाणी वास्तव्यास होते. त्यांच्या भक्तीमुळे शंभू महादेवाचे याठिकाणी शिवलिंग आहे. जुन्या पद्धतीच्या शिव मंदिराबरोबरच बाजूला पाण्यासाठी बांधलेली बारव नजरेस पडते. हे निसर्गरम्य ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते़
डोंगरपायथ्याच्या गावांवर दुष्काळाची छाया असते़ गेल्या अनेक वर्षांपासून पाऊस नव्हता़ त्यामुळे या भागातील निसर्ग सौंदर्य खुलले नव्हते़ ग्रामस्थांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या़ यंदा पाऊस झाल्यामुळे निसर्गाची विविध रूपे पाहायला मिळत आहेत.
- शंकर पाटील,
पोलीस पाटील, भांब