पतीकडून पत्नीचा छळ करून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:27 AM2021-04-30T04:27:21+5:302021-04-30T04:27:21+5:30
एखतपूर येथील दीपाली हिचा विवाह आटपाडी येथील सोमनाथ शामराव सागर याच्याशी नोव्हेंबर २०११ साली झाला होता. लग्नानंतर सागर दाम्पत्यांना ...
एखतपूर येथील दीपाली हिचा विवाह आटपाडी येथील सोमनाथ शामराव सागर याच्याशी नोव्हेंबर २०११ साली झाला होता. लग्नानंतर सागर दाम्पत्यांना दोन अपत्ये झाली. दरम्यान, पती सोमनाथ याचे विवाहबाह्य संबंध असल्याची कुणकुण पत्नी दीपालीला लागली. याबाबत तिने पती सोमनाथ यास जाब विचारला. दरम्यान पतीने पत्नी दीपाली हीस माहेरून ५० हजार रुपये घेऊन ये, तू मला पसंत नाही, मी दुसरे लग्न करणार आहे असे म्हणून शारीरिक, मानसिक छळ करत होता.
या प्रकाराबद्दल दीपालीने सासरे शामराव सागर यास सांगितले. मात्र, ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने दीपाली माहेरी एखतपूरला येऊन राहिली. दरम्यान, १९ एप्रिलला सोमनाथने सासरवाडी एखतपूर येथे येऊन तू घरातून निघून का आलीस, असे म्हणून तिला शिवीगाळ करून मारहाण करू लागला. त्यावेळी आई-वडील व भावाने सोडवासोडवी केली, असे दीपालीने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी पती सोमनाथ शामराव सागर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.