करमाळा -कुर्डूवाडी रस्त्यावर पिकअपच्या धडकेत पती पत्नी ठार

By दिपक दुपारगुडे | Published: November 28, 2023 05:34 PM2023-11-28T17:34:52+5:302023-11-28T17:35:18+5:30

या अपघातात पुष्पा काळे या जागीच तर मनोज काळे यांचा उपचारादरम्यान बार्शीमध्ये मृत्यू झाला आहे. सोमवारी (ता. २७) रात्री अपघात झाला.

Husband and wife killed in pick-up collision on Karmala-Kurduwadi road | करमाळा -कुर्डूवाडी रस्त्यावर पिकअपच्या धडकेत पती पत्नी ठार

करमाळा -कुर्डूवाडी रस्त्यावर पिकअपच्या धडकेत पती पत्नी ठार

सोलापूर : नातेवाइकाचा कार्यक्रमास उपस्थित राहून मोटारसायकलवरून घरी परत येणाऱ्या पती पत्नीस कुर्डुवाडी- करमाळा मार्गावर बोलेरो पिकअपने पाठीमागून धडक दिली. त्यात दुचाकीवरील पती पत्नी दोघे ठार झाले. मनोज पांडुरंग काळे (गुरव) (वय ४८) व पुष्पा मनोज काळे (वय ४२, रा. किल्ला वेस, करमाळा) असे अपघातामध्ये ठार झालेल्या पती- पत्नीचे नाव आहे. या अपघातात पुष्पा काळे या जागीच तर मनोज काळे यांचा उपचारादरम्यान बार्शीमध्ये मृत्यू झाला आहे. सोमवारी (ता. २७) रात्री अपघात झाला.

सोमवारी माढा तालुक्यातील बारलोणी येथील नातेवाइकांना भेटून काळे पती पत्नी सायंकाळी सहाच्या सुमारास करमाळ्याचे दिशेने मोटारसायकल वरून निघाले होते. सालसे गावाच्या पुढे महावितरणच्या जुन्या सबस्टेशन समोर त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून भरधाव येणाऱ्या पिकअप क्र. एम.एच. ४२ – एम. ७३१८ ने जोराची धडक दिली. या अपघातात पुष्पा काळे यांचा जागीच मृत्यू झाला तर मनोज काळे यांना बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातातील पिकअप चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. काळे दाम्पत्याच्या निधनाचे वृत्त समजताच करमाळा उपजिल्हा रुग्णालयासमोर आप्तेष्टांनी गर्दी केली. 

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी रात्री उशिरा मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर रुग्णालयातून दोन्ही मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार देत नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. काळे दाम्पत्याची अंतयात्रा एकत्रितपणे अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Husband and wife killed in pick-up collision on Karmala-Kurduwadi road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.