पती-पत्नी एकत्र प्रवास करताय, एकाकडे तरी ठेवा आरटीपीसीआर रिपोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:27 AM2021-08-20T04:27:03+5:302021-08-20T04:27:03+5:30

कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलल्यानंतर तत्काळ कोरोना नियमांत बदल करण्यात आले आहे. पूर्वी प्रत्येक व्यक्तीचे ७२ तासांच्या आतील आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट ...

Husband and wife travel together, at least keep the RTPCR report | पती-पत्नी एकत्र प्रवास करताय, एकाकडे तरी ठेवा आरटीपीसीआर रिपोर्ट

पती-पत्नी एकत्र प्रवास करताय, एकाकडे तरी ठेवा आरटीपीसीआर रिपोर्ट

Next

कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलल्यानंतर तत्काळ कोरोना नियमांत बदल करण्यात आले आहे. पूर्वी प्रत्येक व्यक्तीचे ७२ तासांच्या आतील आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक होते. गाडीत पती व पत्नी असल्यास दोघांपैकी एकाकडे तरी रिपोर्ट असणे बंधनकारक आहे तर खासगी वाहनांतील प्रवाशांकडे मात्र निगेटिव्ह प्रमाणपत्र ठेवावे लागणार आहे. असे असले तरी चेकपोस्टवरील बंदोबस्त कमी केल्याने वाहने न थांबता ये-जा करत आहेत. त्यामुळेच गाणगापुरातील गर्दी वाढली आहे.

----

चेकपोस्टवरील टेस्टिंग बंद

यापुर्वी चेकपोस्टवरच प्रवाशांची अँटिजन टेस्ट केली जात होती. मात्र, सध्या त्या ठिकाणी केवळ तंबूच असून तपासणीसाठी आरोग्याची टीम नाही. अफझलपूर तालुक्यात बळोरगी, माशाळ, अजुणगी, आळंद तालुक्यातील निंबाळ, हिरोळी या ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. निर्बंधात शिथिलता आणल्याने शिस्तच बिघडल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: Husband and wife travel together, at least keep the RTPCR report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.