पत्नीच्या खून प्रकरणात पतीला कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:08+5:302021-07-02T04:16:08+5:30

अक्कलकोट : हन्नूर चौकात बुधवारी झालेल्या विवाहितेच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या पतीला न्यायालयात उभे केले असता न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाच दिवसांची ...

Husband jailed in wife murder case | पत्नीच्या खून प्रकरणात पतीला कोठडी

पत्नीच्या खून प्रकरणात पतीला कोठडी

Next

अक्कलकोट : हन्नूर चौकात बुधवारी झालेल्या विवाहितेच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या पतीला न्यायालयात उभे केले असता न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

३० जून रोजी हन्नूर चौकात पुतळाबाई शिवराज मलगोंडा (३३) या विवाहितेचा चारित्र्याच्या संशयावरून आणि संपत्तीच्या वादातून उशीने तोंड दाबून खून करण्यात आला. याबाबत विवाहितेचा भाऊ बसवराज शेेेळके यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पती शिवराज बसवराज मलगोंडा यास पोलिसांनी अटक केली.

१ जुलै रोजी येथील न्यायाधीश गणेश नंदगवळे यांच्या न्यायालयासमोर उभे केले असता त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील म्हणून इस्माईल बेसकर यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे विजय हर्डीकर यांनी काम पाहिले. अधिक तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे करीत आहेत.

Web Title: Husband jailed in wife murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.