पत्नीच्या धास्तीने पतीने सोडला धीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:21 AM2021-05-17T04:21:08+5:302021-05-17T04:21:08+5:30
दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे सेवानिवृत्त कक्ष अधिकारी यलगोंडा ऊर्फ वाय.डी. कोळी (वय ७४) यांचे आज अल्पशा आजाराने कुसूर येथे ...
दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे सेवानिवृत्त कक्ष अधिकारी यलगोंडा ऊर्फ वाय.डी. कोळी (वय ७४) यांचे आज अल्पशा आजाराने कुसूर येथे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाईंना कोरोनाच्या उपचारासाठी सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
स्वतः कोळीदेखील हॉस्पिटलमध्ये आले होते; परंतु त्यांच्या वाढत्या वयामुळे कुटुंबीयांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये थांबण्यास विरोध केला. त्यामुळे ते गावी परतले अन् गुरुवारी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाला. ही गोष्ट त्यांच्यापासून लपवून ठेवण्यात आली. गेले दोन दिवस घरातील वातावरण बदलून गेले होते.
---
शेवटपर्यंत पत्नीची धास्ती
हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलेल्या पत्नीच्या आजाराने कोळी यांचे खच्चीकरण झाले होते. येणाऱ्या प्रत्येकाला माझी लक्ष्मी कुठे आहे, ती कधी येणार, असा प्रश्न विचारून भंडावून सोडत होते. शनिवारपासून त्यांनी पत्नी वियोगाने अन्नपाणी सोडून दिले आणि आज सायंकाळी त्यांचाही दुर्दैवी अंत झाला.
---
फोटो :१६ पती पत्नी