पती कोर्टासाठी मुंबईला.. सासू कर्नाटकात;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:20 AM2021-07-25T04:20:35+5:302021-07-25T04:20:35+5:30

चोरट्याने घरात शिरुन दागिने केले लंपास बार्शी : शहरातील लातूर रोडवरील राहत्या बंद घराचा कडीकोयंडा अज्ञात चोरट्यांनी तोडून कपाटात ...

Husband to Mumbai for court .. Mother-in-law in Karnataka; | पती कोर्टासाठी मुंबईला.. सासू कर्नाटकात;

पती कोर्टासाठी मुंबईला.. सासू कर्नाटकात;

Next

चोरट्याने घरात शिरुन दागिने केले लंपास

बार्शी : शहरातील लातूर रोडवरील राहत्या बंद घराचा कडीकोयंडा अज्ञात चोरट्यांनी तोडून कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, रोख, टीव्ही, असा ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. शुक्रवारी २३ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.याबाबत खाजाबेगम अब्दुल कादर पटेल, (वय ४२, रा. लातूर रोड गणेशनगर) यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. यात ४५ हजारांच्या सोन्याच्या १५ ग्रॅमच्या तीन अंगठ्या, ७५०० रुपयांचे चांदीचे पैंजण व वाळे, रोख १० हजार रुपये व १० हजारांचा टीव्ही, चोरून नेला आहे.

यातील फिर्यादीचे पती हे न्यायालयाच्या कामकाजासाठी मुंबईला गेले होते, तर फिर्यादीची आई आजारी असल्याने कुलूप लावून मुलींसह कर्नाटकात माहेरी गेल्या होत्या. याचा तपास पो. नाईक खैरे करीत आहेत.

---

Web Title: Husband to Mumbai for court .. Mother-in-law in Karnataka;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.