पतीने केला पत्नीचा गळा दाबून खून; गळफास घेऊन स्वतःचेही जीवन संपविले, माढा तालुक्यातील घटना
By Appasaheb.patil | Updated: September 23, 2023 17:15 IST2023-09-23T17:14:26+5:302023-09-23T17:15:54+5:30
भुर्णी पोलीस स्टेशन मध्ये याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतीने केला पत्नीचा गळा दाबून खून; गळफास घेऊन स्वतःचेही जीवन संपविले, माढा तालुक्यातील घटना
टेंभुर्णी : पतीने पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतः राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना माढा तालुक्यातील व्होळे (खुर्द) येथे शनिवारी सकाळी समोर आली आहे. टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, प्रशांत महादेव ओहोळ (वय ३४) रा. मोडनिंब .सध्या रा. व्होळे (खुर्द) याने राहत्या घरी पत्नी सोनाली ओहोळ (वय २६) हिचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळतात टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनास्थळास भेट देऊन माहिती घेतली आहे.
प्रशांत ओहोळ हा मूळचा मोडनिंब येथील रहिवाशी असून वडिलांशी भांडण झाल्याने तो काही महिन्यापासून व्होळे येथे सासरवाडीत राहत होता. दरम्यान, पत्नीचा खून करण्याचे व स्वतः आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आले नसून टेंभुर्णी पोलीस त्याचा शोध घेत आहेत . पती-पत्नीचे मृतदेह टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहेत.