शेतातून परत येणाऱ्या पती-पत्नींना तिघांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:12 AM2021-03-30T04:12:06+5:302021-03-30T04:12:06+5:30
बार्शी : शेतातील कामे आटोपून पती-पत्नी दुचाकीवरून घराकडे येताना तिघा अज्ञातांनी अडवून रोख रकमेसह तर पत्नीच्या ...
बार्शी : शेतातील कामे आटोपून पती-पत्नी दुचाकीवरून घराकडे येताना तिघा अज्ञातांनी अडवून रोख रकमेसह तर पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागिने दोन मोबाइल असा एक लाखाचा ऐवज चोरून नेला. लक्ष्याची वाडी (ता.बार्शी) शिवारात २७ मार्च रोजी ही घटना घडली. यातील एकास अटक करून न्यायालयात उभे केले. त्याला ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत धनंजय शिवाजी चव्हाण (वय ४० वर्षे, रा.तानाजी चौक, बार्शी) यांनी तालुका पोलिसांत तक्रार देताच, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. यात चोरीस गेल्यात महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्यांचे ६६ हजारांचे सोन्याचे गांठण, ९ हजाराचे दोन मोबाइल, ४ हजारांची १ ग्रॅमची बाळी व रोख ५ हजार असा १ लाखाचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २७ मार्च रोजी यातील फिर्यादी व त्याची पत्नी जयश्री हे दोघे शेतातील कामे संपवून परत येण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. फिर्यादीचे शेतात उपळाई रोड, कॅनालच्या जवळील लक्ष्याचीवाडी येथे तीन अनोळखी इसम आले. त्यांनी पती-पत्नीला धक्काबुक्की वरील एक लाखांचा ऐवज चोरून नेला.
दरम्यान, याचा तपास करत असताना, यातील एक आरोपी विजय कस्तुर भोसले (वय २३ रा.उपळाई ठो.ता.बार्शी) यास अटक करून न्यायाधीश आर. एस. धडके यांच्यासमोर उभे केले. त्यास ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे करीत आहेत.