पत्नीचा खून करणाºया शिक्षक पतीस जन्मठेप, सोलापूर सत्र न्यायालयाचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:54 AM2018-10-11T10:54:04+5:302018-10-11T10:55:14+5:30
सत्र न्यायालय : वैद्यकीय अधिकाºयांची साक्ष महत्त्वपूर्ण
सोलापूर : पत्नीचा खून करून खोटी फिर्याद देणाºया ठाणे महानगरपालिका शाळेतील शिक्षक सुभाष भोसले याला जिल्हा न्यायाधीश एस. एम. पाटील यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
खटल्याची पार्श्वभूमी अशी की, आरोपी सुभाष निवृत्ती भोसले (वय ५०, रा. संजय नगर, बाबाजी पाटील वाडी, मुंब्रा ठाणे) हा ठाणे महानगरपालिका शाळा क्र. ८१ येथे वरिष्ठ शिक्षक म्हणून कार्यरत होता. सासूला माकड चावल्याने तिला पाहण्यासाठी तो दि. २८ मे २०१४ रोजी सायं. ५ वा. पत्नी सुनंदा हिला मुंब्रा येथून मोहोळ तालुक्यातील मसले चौधरीकडे कारमधून जात होता. टेंभुर्णी येथे एस.टी. स्टॅन्डसमोर एक तास आराम करून पुन्हा फ्रेश होऊन पुढील प्रवासाला निघाला.
टेंभुर्णीपासून ९ कि.मी. अंतरावर सापटणे गावाजवळ पहाटे ३ च्या सुमारास पाठीमागून अज्ञात कारमधून दोन इसम आले. त्यांनी सुभाष भोसले याची कार अडवली. मला बाहेर काढून सोने व रोख रक्कम असा एकूण ६० हजार रुपये काढून घेतले. दरम्यान, पत्नी सुनंदा उठली व तिने कसले पैसे असे विचारले असता अज्ञात इसमांनी मारहाण केली व अंगावरचे दागिने काढून घेतले. त्यानंतर आम्हा नवरा-बायकोला कारमध्ये घालून खड्ड्यात ढकलून दिले.
यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला, मी सकाळी हा प्रकार एका जीपचालकाला सांगितला, अशी फिर्याद टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी या प्रकरणी तपास केला असता फिर्यादी शिक्षक सुभाष भोसले हाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. सुभाष भोसले याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅड. आनंद गोरे, आरोपीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले.
वकिलांचा युक्तिवाद...
- या प्रकरणी ११ साक्षीदार तपासण्यात आले. घटनास्थळावरील पंच, इन्स्पेक्टर, पंच, मयताची नणंद व इतर मयताचे नातेवाईक हे सर्व जण फितूर झाले. यातील डॉक्टर, तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. यात सरकारतर्फे अॅड. आनंद गोरे यांनी घटनेच्या दिवशी आरोपी व त्याची पत्नीच कारमध्ये होते. आरोपीने खून हा पूर्वनियोजन पद्धतीने घडवून आणला. त्याचे वर्तन, पूर्वनियोजन, हेतू व उद्देश ठेवून केलेला खून असल्याचे त्याचे मागील वर्तनावरून व गोळा केलेल्या पुराव्यांवरून स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे फिर्यादी हा आरोपी असल्याचे दिसून येते, असा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीशांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड सुनावला. दंड न भरल्यास ६ महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली. यातील आरोपी मे २०१४ ला अटक झाल्यापासून त्याची जामीन नामंजूर झाल्यापासून तो जिल्हा कारागृहात न्यायालयीन कस्टडीमध्ये होता.
सुनंदा ही आरोपीची तिसरी बायको...
- आरोपी सुभाष भोसले याची पहिली बायको यशोदा १९९७ साली टी.बी.च्या आजाराने मयत झाली. त्यामुळे त्याने २००५ साली राजश्री यांच्यासोबत विवाह केला होता. राजश्रीने आत्महत्या केल्याने त्याच्या विरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. २०१३ मध्ये त्याने सुनंदा यांच्याशी विवाह केला.