मी सक्रिय राजकारणातून निवृत्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते; सुशीलकुमार शिंदे यांची स्पष्टोक्ती
By राकेश कदम | Published: October 24, 2023 02:20 PM2023-10-24T14:20:29+5:302023-10-24T14:20:54+5:30
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
राकेश कदम
सोलापूर : मी आता सक्रिय राजकारणातून निवृत्त झालोय. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे उमेदवार असतील अशी स्पष्टोक्ती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी दिली.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीबद्दल विचारले असता शिंदे म्हणाले आता मी किती वेळा सांगू. प्रणिती शिंदे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. मी राजकारणातून निवृत्त झालोय.
हा संवाद झाल्यानंतर सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसचे पदाधिकारी नवरात्रोत्सव मंडळाच्या भेटीसाठी रवाना झाले.
दरम्यान, सुशीलकुमार शिंदे गेली पंधरा दिवस सोलापुरात तळ ठोकून आहेत. निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीवर शरद पवार गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या संदर्भात काॅंग्रेसच्या नेत्यांकडून मंगळवारीही कोणती प्रतिक्रिया आली नाही.