''मोदी हटाओ' हाच विरोधकांचा नारा, देशाच्या भविष्याचा अजेंडा त्यांच्याकडे नाही!'
By appasaheb.patil | Published: April 17, 2019 11:40 AM2019-04-17T11:40:36+5:302019-04-17T12:14:34+5:30
दिवसा स्वप्न बघणाऱ्यांना आणि खोटे बोलणाऱ्यांना मी थांबवू शकत नाही, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.
सोलापूर : देशात पाच वर्षातील सत्ता काळात भाजपाकडून एकही घोटाळा झाला नाही. मात्र विरोधकांना हे पाहवत नाही, म्हणून सातत्याने विरोधकांकडून खोटेखोटे आरोप केले जात आहेत. दिवसा स्वप्न बघणाऱ्यांना आणि खोटे बोलणाऱ्यांना मी थांबवू शकत नाही, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.
अकलूज (ता़ माळशिरस) येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा विजयसिंह मोहिते- पाटील, आ. नारायण पाटील, शिवसेनेचे शिवाजी सावंत, सुधाकरपंत परिचारक, आ. निलमताई गोरे, माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक - निंबाळकर, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचनताई कुल, आ. प्रशांत परिचारक, माजी खासदार रणजितसिंह मोहिते- पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, उत्तमराव जानकर आदी उपस्थित होते.
PM in Solapur, Maharashtra: Sharad Rao bhi bade khiladi hain, wo samay se pehle hawa ka rukh samajh jaate hain. Aur wo kabhi aisa kuch nahi karte jiske kaaran unko aur unke parivar ko kharonch aa jaaye, baaki koi bhi bali chadh jaaye to chadh jaaye. https://t.co/q8uLhiLUMX
— ANI (@ANI) April 17, 2019
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस फक्त हे माझ्याविरूद्ध लढत आहेत. या देशाला भविष्यात कुठे घेऊन जाययचे याबाबतचा अजेंडा विरोधकांकडे नाही. विरोधकांकडून यंदाच्या निवडणुकीत फक्त एकच नारा देण्यात येत आहे तो म्हणजे मोदी हटाव... मोदी हटाव...असे मोदी म्हणाले. याचवेळी राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
PM in Solapur, Maharashtra: Those sitting in Delhi in AC rooms & keeping a tab on things which will happen after who hugs whom, after who shakes hands with whom, after who looks at whom, they don't know the ground reality. Now I know why Sharad Rao ran away from the battleground. pic.twitter.com/aCJMtAeBSH
— ANI (@ANI) April 17, 2019