अवकाळीने झोप उडाली... गारव्याने हुडहुडी भरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:02 AM2021-02-20T05:02:31+5:302021-02-20T05:02:31+5:30
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात पडणारा पाऊस रब्बी पिकांसाठी हानीकारक ठरत आहे. सांगोला तालुक्यातील डाळिंबाच्या पट्ट्यातही पावसाने हजेरी ...
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात पडणारा पाऊस रब्बी पिकांसाठी हानीकारक ठरत आहे. सांगोला तालुक्यातील डाळिंबाच्या पट्ट्यातही पावसाने हजेरी लावली. माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यातही पाऊस पडला. जिल्ह्यात इतर ठिकाणीही पावसाने नुकसान झाले. गुरुवारी रात्रभर सोसाट्याचे वारे वाहत होते. सकाळी ११ वाजेपर्यंत ढगाळ हवामान व वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. हा गारवा जनावरांनाही हानीकारक ठरणारा आहे.
पावसाचे थेंब व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ज्वारी, गहू व इतर पिके आडवी झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. पाऊस व वाऱ्यामुळे द्राक्षाचे घड गळून पडले तर द्राक्षाचा रंग बदलल्याने गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. काढणीला आलेल्या व काढणी झालेल्या कांदा पिकांचेही नुकसान झाले आहे.
आंब्याचा मोहोर, कैऱ्या गळाल्या...
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्याचा मोहर व कैऱ्याही झडल्या आहेत. यावर्षी चांगला पाऊस पडल्याने मोहराने आंब्याची झाडे लगडली होती. यावर्षी आंबा भरपूर येईल अशा अपेक्षेवर बसलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.