मी अजून बारामतीचा नाद सोडलेला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:34 AM2021-02-23T04:34:06+5:302021-02-23T04:34:06+5:30
करमाळा तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे, यशकल्याणीचे ...
करमाळा तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे, यशकल्याणीचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, प्रा. वैभव फटांगरे उपस्थित होते.
महादेव जानकर म्हणाले, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यासाठी खरा विरोध काँग्रेस, भाजपचा असून या दोन पक्षामुळेच अद्यापपर्यंत ही जनगणना झालेली नाही. यासाठी आपल्या पक्षाचे २५ खासदार संसदेमध्ये निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न् करत आहोत. राज्यात भाजपा-सेना पक्षाचे सरकार असताना सर्व पक्षाच्या व घटक पक्षाच्या नेते मंडळींना विश्वासात घेवून आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळून दिले. ते आरक्षण टिकण्यासाठी योग्य ते नियोजन करुन कोर्टामध्ये वकींलाची फौज उभी करुन मागासवर्गीय आयोग नेमून योग्य प्रकारे हे आरक्षण लागू गेले, मात्र राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर सध्याच्या तीन पक्षाच्या पायावर चालणाऱ्या सरकारने हे आरक्षण टिकविण्यासाठी विशेष असा प्रयत्न् केला नाही. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. या समाजाबरोबर धनगर आरक्षणाचा विषय हा केंद्र सरकारच्या अधिकारात येते. हे आरक्षण मिळविण्यासाठी आपला पक्ष कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
माढ्यासह या पाच लोकसभा मतदारसंघातून तयारी
आगामी लोकसभेसाठी रासप माढ्यासह बारामती, परभणी, जालना, हिंगोली या पाच मतदारसंघात लोकसभा निवडणूक सर्व ताकदीनिशी लढवणार आहे. २००९, २०१४ च्या लोकसभेसाठी काही तयारी नसताना निवडणूक लढविली. २०१९ मध्ये एकही उमेदवार नव्हता, मात्र आगामी लोकसभा तयारीनिशी लढणार असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले.
फोटो
२१करमाळा-परिषद
ओळी : करमाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर.