पराभवातून बरेच काही शिकलो - शरद पवार

By admin | Published: May 31, 2014 05:21 AM2014-05-31T05:21:01+5:302014-05-31T13:17:57+5:30

लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य असून, पराभवातून आम्ही खूप काही शिकलो आहे़

I learned a lot from defeat - Sharad Pawar | पराभवातून बरेच काही शिकलो - शरद पवार

पराभवातून बरेच काही शिकलो - शरद पवार

Next

सांगोला (जि. सोलापूर) : लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य असून, पराभवातून आम्ही खूप काही शिकलो आहे़ आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस, राष्टÑवादी आघाडी करून लढविणार असल्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी सांगितले. पवार म्हणाले, या निवडणुकीत जनतेने स्थैर्याच्या बाजूने कौल दिला आहे. निवडणुकीत यश-अपयश येतच असते म्हणून निवडून आलेल्या सरकारने हुरळून जाऊ नये, असे सांगून आम्ही अपयश आले म्हणून खचून जाणार नाही. काँग्रेस व आम्ही यापूर्वी १९७७ व १९९५ साली पराभव पाहिला आहे. १९७७ नंतर दोन वर्षांतच जनतेने परत आम्हास संधी दिली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विरोधात जनतेने कौल देताना देशाच्या स्थैर्यासाठी भाजपाला साथ दिली. मात्र तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश व ओडिशा येथे मात्र जनतेने सक्षम पर्याय म्हणून राज्यातील घटक पक्षास मतदान केल्याचे निवडणुकीच्या निकालावरून दिसून आले. आगामी विधानसभेची निवडणूक एकत्रीतच लढविणार असून, कोणाला किती जागा याविषयी अद्याप निर्णय झाला नाही. देशात जनतेने स्थैर्याला संधी दिली आहे. एखादी विचारधारा किंंवा लाटेचा बारकाईने विचार करण्याचे गरज आहे, असेही पवार म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: I learned a lot from defeat - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.