मोबाईलमधून टेक्स मेसेजची लिंक उघडून पाहिली अन् अडीच लाख गायब
By विलास जळकोटकर | Published: February 14, 2024 06:30 PM2024-02-14T18:30:02+5:302024-02-14T18:30:19+5:30
फिर्यादीच्या खात्यातून अनोळखी मोबाईलधारकाने एकूण २ लाख ६५ हजर रुपये वेगवेगळ्या खात्यात ट्रान्स्फर करुन घेतले.
सोलापूर: अनोळखी मोबाईल नंबरवरुन आलेल्या टेक्स मेसमधील लिंक ओपन करुन पाहताच खातेदाराच्या बँक खात्यामधूृन तब्बल २ लाख ६५ हजार रुपये रक्कम क्षणात ट्रान्सफर झाली. ही धक्कादायक घटना २० डिसेंबर रोजी १:३० ते ४:४५ या कालावधीत कराड अर्बन बँक, चाटी गल्ली येथे घडली. या प्रकरणी खातेदार प्रकाश कृष्णात पाटील (वय- निर्मल नगर, नवीन आरटीओ, विजापूर रोड सोलापूर) यांनी सायबर पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन फिर्याद दिल्याने शनिवारी गुन्हा नोंदला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी हे विजापूर रोडवरील निर्मल नगरात राहतात. त्यांचे एसबीआय बँकेत खाते आहे. २० डिसेंबर रोजी दुपारी १:३० ते पावणेपाच या दरम्यान, चाटी गल्ली येथील कराड अर्बन बँकेत आले.
तेथे अनोळखी ९४८१३१६२१५ या मोबाईलवरुन dear sbi user your sbi yono A/c Will be blocked please update your pancard today login with sbi YONO getbankin click hear http://cptishortgy-SBI KYC असा मेसेज आला. त्यानुसार फिर्यादीचे एसबीआय योनग ॲप ओपन झाले. त्यांनी विचारलेली माहिती फिर्यादी व ओटीपी अपलोड केला. तेव्हा फिर्यादीच्या खात्यातून अनोळखी मोबाईलधारकाने एकूण २ लाख ६५ हजर रुपये वेगवेगळ्या खात्यात ट्रान्स्फर करुन घेतले. अशा प्रकारे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात भादंवि ४२० सह आयटी ॲक्ट ६६ (सी)(डी) अन्वये गुन्हा नोंदला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा करीत आहेत.
कोणत्याही फसव्या लिंकवर जावू नका अथवा क्लिक करुन नका. याबद्दल आम्ही वेळोवेळी आवाहन करीत आहोत. फसले गेल्यानंतर आर्थिक फसवणूक तर होतेच शिवाय मनस्तापही सहन करावा लागतो. प्रत्येकांनी वेळीच दक्षता घ्यावी. - श्रीशैल गजा, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, सोलापूर आयुक्तालय, सोलापूर