तिचं मुंडकं दिसलं अन् माझं आभाळ फाटलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:16 AM2020-12-07T04:16:36+5:302020-12-07T04:16:36+5:30
दयानंद शिंदे हे माजी आ. नारायण पाटील यांच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने रडत असताना उपस्थितांनाही हुंदके अनावर झाले. बिबट्याच्या हल्ल्यात ...
दयानंद शिंदे हे माजी आ. नारायण पाटील यांच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने रडत असताना उपस्थितांनाही हुंदके अनावर झाले.
बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जयश्री शिंदे यांच्या पतीला भेटण्यासाठी माजी आ. नारायण पाटील गेल्यानंतर त्यांना रडू आवरले नाही. ते धाय मोकलून हुंदके देत सतत रडत आपल्या भावनांना वाट करून दिली व उपस्थितांची मने हेलावून गेली. आम्हाला दोन लहान मुली व एक मुलगा असून तीनही मुले सात वर्षांपेक्षा लहान आहेत. त्याचं मातृत्व हरपल्याचं दु:ख त्यांनी व्यक्त केलं. यावेळी नारायण पाटील यांनी त्याला धीर देत प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत ठेवा असे सांगत त्याला धीर दिला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, सदस्य अतुल पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, मार्केट कमिटीचे माजी संचालक देवानंद बागल, आण्णासाहेब काळे उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार नारायण पाटील यांनी मंत्री संजय राठोड यांच्याशी संपर्क साधला अन् म्हणाले, काहीही करा पण त्या बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश काढा व मयत झालेल्या कुटुंबीयांना तत्काळ २५ लाखांचा मदत द्या. त्यांच्या वारसाला वन खात्यात कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आदेश काढा अशी विनंती केली.