माझी तर नोबॉलवरच विकेट गेली; माजी मंत्री संजय राठोड यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 10:52 AM2021-09-13T10:52:04+5:302021-09-13T10:54:09+5:30

भटक्या विमुक्तांचा आवाज सरकार पर्यंत पोहोचत नाही म्हणून या समाजाची केविलवाणी स्थिती होत असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले

I took the wicket on the noball; Former Minister Sanjay Rathore's mourning | माझी तर नोबॉलवरच विकेट गेली; माजी मंत्री संजय राठोड यांची खंत

माझी तर नोबॉलवरच विकेट गेली; माजी मंत्री संजय राठोड यांची खंत

Next

सोलापूर : राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही माझी तर नो बॉल वरच विकेट गेली. आपण निर्दोष असल्याचे सांगण्यासाठी शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांनी हे वक्तव्य केले. मंत्रिमंडळातील फेरसमावेशाबाबतचा संपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाती असल्याचे त्यांनी सांगितले.

मुळेगावतांडा (ता. द.सोलापूर) येथे दक्षिण सोलापूर , उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील बंजारा समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांसाठी राज्यभर दौरा करीत असल्याचे सांगताना माजी मंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत मात्र कानावर हात ठेवले. छगन भुजबळ यांचे निर्देशत्व सिद्ध झाले न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली. आपल्यावरील आरोपाबाबत काय या प्रश्नाला बगल देत मंत्रिमंडळ प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत मात्र त्याबाबत फक्त मुख्यमंत्री बोलतील असे त्यांनी वारंवार सांगितले.

भटक्या-विमुक्तांच्या पंचवीस मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले असून मुख्य सचिवासोबत त्यावर चर्चा झाली आहे, लवकरच मुख्यमंत्री बैठकीची वेळ देतील असे त्यांनी सांगितले. 1872 सली इंग्रज सरकारने बंजारा समाजासह काही जातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला आहे हा शिक्का पुसण्यासाठी भटक्या विमुक्त जातीना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपा-सेना युती सरकारच्या काळात पोहरादेवी येथे िलेली आश्‍वासनांची पूर्तता होत नाही याकडेही सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण राज्यभर दौरा करीत असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले

 या मेळाव्याला माजी महापौर अलका राठोड राष्ट्रीय बंजारा समाजाचे कार्याध्यक्ष डॉ टी सी राठोड, सिनेअभिनेता सी के पवार, प्रा भोजराज पवार शैलजा राठोड पांडुरंग राठोड दगडू राठोड बाळू पवार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप राठोड यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते

------------

नाईक महामंडळाला निधी नाही

अत्यंत दुरावस्थेत जगणाऱ्या बंजारासह अन्य जाती-जमातींच्या उद्धारासाठी सरकारने वसंतराव नाईक विकास महामंडळाची स्थापना केली काही काळ या महामंडळाने चांगले काम केले मात्र अलीकडच्या काळात सरकारने महामंडळाला निधीची तरतूदच केली नाही. भटक्या विमुक्तांचा आवाज सरकार पर्यंत पोहोचत नाही म्हणून या समाजाची केविलवाणी स्थिती होत असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले

 

Web Title: I took the wicket on the noball; Former Minister Sanjay Rathore's mourning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.