‘मीही गृहमंत्री होतो', 'गृहमंत्र्याला कोण देतंय १०० कोटी?’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 11:26 AM2022-04-09T11:26:34+5:302022-04-09T11:29:14+5:30
अनिल देशमुख मला बोलले नाहीत. मी तसं लांबून ऐकलं. याला काय अर्थ आहे हो?
सोलापूर - श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्री छगन भुजबळ पंढरपूरला आले होते. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी समितीच्या वतीने भुजबळ यांचा सत्कार केला. यावेळी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे भुजबळ म्हणाले, ज्या वाझेला अटक झाली आहे तो चांदीवाल आयोगासमोर सांगतो की, अनिल देशमुख मला बोलले नाहीत. मी तसं लांबून ऐकलं. याला काय अर्थ आहे हो? याचा अर्थ काही करून त्यांच्यावर काहीतरी आरोप ठेवायचे आणि असे मोठे १०० कोटी, ५०० कोटी, १००० कोटी असे आरोप ठेवले की, मग ‘ईडी’ची केस मजबूत करायची आणि जास्तीतजास्त तुरुंगात ठेवायचं हा ‘ईडी’चा प्रकार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
गेल्या ५० वर्षांत असे पाहिले नाही
कोणी वसूल केले पैसे? कुठे गेले पैसे? मिळाले का तुम्हाला? पण फक्त सांगायचं की, हा असं बोलला असं आम्ही ऐकायचं आणि यावर खटला उभा राहतो, असे आपण गेल्या ५० वर्षांत कधी पाहिले नाही, असे भुजबळ यांनी सांगितले.