मिळाली संधी तर काम करेन; बदली मागणाºया जिल्हा आरोग्य अधिकाºयाचा पलटवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 11:10 AM2020-06-09T11:10:31+5:302020-06-09T11:17:30+5:30
सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाचा मुदतवाढीचा प्रस्ताव; पदाधिकारी मात्र नाराज
सोलापूर : राज्याच्या आरोग्य सचिवाकडे बदली मागणाºया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी आता पलटवार केला आहे. मिळाली संधी तर काम करण्याची तयारी असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले आहे. इकडे त्यांना डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. मात्र डॉ. जमादार यांच्या कार्यपद्धतीवर पदाधिकारी नाराज असल्याने हा विषय वादातीत ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ भीमाशंकर जमादार यांनी २ जून रोजी आरोग्य सचिवांकडे अर्ज करून प्रकृती आस्वस्थ व कौटुंबिक कारण दाखवून विनंती बदलीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे ते जूनअखेर सेवानिवृत्त होत आहेत. कोरोना साथीची पार्श्वभूमी व निवृत्तीनंतर आणखी दोन वर्षे काम करण्यास संधी देण्याचे शासनाचे धोरणाचा फायदा देत डॉ. जमादार यांना डिसेंबरपर्यंत या पदावर ठेवण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी म्हटले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या सभेत त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. त्यानंतरही आरोग्य विभाग सदस्यांच्या रडारवर राहिला. आरोग्य विभागाने खरेदी केलेले हिमग्लोबीन तपासणी यंत्र, डास मारणी यंत्राच विषय वादातीत आहे. याबाबत तक्रार करणारे सदस्य मात्र आता गप्प बसले आहेत. कोरोणाची साथ सुरू झाल्यावर जिल्हा नियोजन व आमदारांनी डॉक्टर, आरोग्य कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी साहित्य खरेदीसाठी निधी दिला. मात्र साहित्य खरेदीसाठी प्रशासनाकडून दोन महिने दिरंगाई झाली. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीत या खरेदी प्रकरणाची चौकशी करण्याचा ठराव झाला आहे. मात्र त्यानंतर वेगाने हालचाली झाल्या. फायलीवर सह्या झाल्या व साहित्याची खरेदी सुरू झाली आहे. खरेदी नियमानुसार केल्याने चौकशीत काहीही निष्पन्न होणार नाही असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे आरोग्य साहित्य खरेदी विलंबाच्या चौकशीची मागणी करणाºया उमेश पाटील यांच्या वैयक्तिक कार्यक्रमाला डॉ. जमादार यांनी हजेरी लावल्याने अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे यांच्यासह अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्याची झेडपीत चर्चा आहे.
-----------
पदाधिकारी आहेत नाराज...
अधिकारी काहीच ऐकत नसल्याने पदाधिकारी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात नाराज मंडळीची बैठक झाली. यात अधिकाºयांनाच बदलण्याचे ठराव आणण्यावर चर्चा झाली. त्यानंतर झालेल्या घडामोडीवर हा विषय आता मागे पडल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाºयांनी विरोधकांना गाठल्याने झेडपीत सत्तेवर असलेल्यांचा नाईलाज झाला आहे. दुसरीकडे अधिकाºयांअंतर्गत कारवाई झालेला एक गट सक्रीय झाला असल्याची चर्चा आहे.
--------------
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी जे नियोजन व्हायला हवे होते, ते डॉ. भीमाशंकर जमादार यांना करता आलेले नाही. त्यामुळे मी त्यांच्या कामावर असमाधानी आहे. त्यांना मुदतवाढीचा प्रश्नच येत नाही.
- दिलीप चव्हाण, सभापती, आरोग्य समिती
वैयक्तिक कारणासाठी बदली अर्ज दिला होता. कार्यकारी पदाबाबत न्यायालयाने दिलेला निर्णय असला तरी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर निवृत्तीनंतरही सेवा करण्यास परवानगी देण्याबाबत शासनाने परिपत्रक काढले आहे. त्यानुसार संधी मिळाली तर हरकत नाही.
डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा आरोग्य अधिकारी