भगीरथ भालके यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याबाबत शिफारस करीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:21 AM2021-02-14T04:21:51+5:302021-02-14T04:21:51+5:30
मंगळवेढा : भगीरथ भालके यांना मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याबाबत पक्षीय स्तरावर शिफारस करीन. जिल्हाध्यक्षांनी ठरवलेच आहे तर त्यात ...
मंगळवेढा : भगीरथ भालके यांना मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याबाबत पक्षीय स्तरावर शिफारस करीन. जिल्हाध्यक्षांनी ठरवलेच आहे तर त्यात बदल होणार नाही, असे प्रतिपादन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
ते मंगळवेढा येथील स्व. आ. भारत भालके यांच्या जयंतीनिमित्त मतदारसंघातून सुरू करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ. राजन पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. संजयमामा शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, उत्तम जानकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के, आरपीआय कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, राहुल शहा, लतिफ तांबोळी, भारत बेदरे, मुजम्मिल काझी, अरुणाताई माळी, अनिता नागणे, संगीता कट्टे, विजय खवतोडे, मारुती वाकडे, अजित जगताप, चंद्रकांत घुले, दिलीप जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहोळचे माजी आ. राजन पाटील यांनी भारत भालके हे अतिशय संघर्ष करणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या संघर्षाचा वारसा भगीरथ भालके निश्चितपणे पुढे घेऊन जातील.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी पंढरपूर व मंगळवेढ्याचे जनतेच्या मनातील उमेदवार आम्हाला समजला असून या जनसंवाद यात्रेला आलेला जनसमुदाय पाहता भगीरथ भालके यांच्याशिवाय दुसऱ्याला उमेदवारी दिली जाणार नाही. पक्षश्रेष्ठींकडे आम्ही भगीरथ यांच्या नावाची मागणी करणार असून इतर उमेदवार याठिकाणी दिला जाणार नाही, असे सांगितले. आ. प्रणिती शिंदे,
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांची भाषणे झाली. शनिवारी सायंकाळी येथील आठवडा बाजार मैदानात जनसंवाद यात्रेचा शुभारंभ सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग चौगुले यांनी केले.
सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार माजी सभापती संभाजी गावकरे यांनी मानले. यावेळी उमेश पाटील, उत्तमराव जानकर, दत्ता म्हस्के, नारायण घुले, शिवानंद पाटील, यशवंत खताळ यांनी मनोगत व्यक्त केले.
----
मंगळवेढ्यातील श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या 19 हजारांपेक्षा अधिक सभासदांना अक्रियाशील ठरवण्याचे कारस्थान विद्यमान संचालक मंडळाने केले असून याबाबत सहकारमंत्री यांनी सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार देण्यासंबंधी कार्यवाही करावी, अशी विनंती यावेळी व्यासपीठावर भगीरथ भालके यांनी केली.