तोळणूरमध्ये अक्कमहादेवी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:26 AM2021-08-22T04:26:06+5:302021-08-22T04:26:06+5:30
शुक्रवार सकाळी ष.ब्र. शिवशंकर शिवाचार्य महास्वामी हिरेमठ तोळणूर, चन्नमल्ल महास्वामी गंगाधर मठ तोळणूर यांच्या दिव्य सान्निध्यात बसवलिंगेश्वर महास्वामीजी विरक्त ...
शुक्रवार सकाळी ष.ब्र. शिवशंकर शिवाचार्य महास्वामी हिरेमठ तोळणूर, चन्नमल्ल महास्वामी गंगाधर मठ तोळणूर यांच्या दिव्य सान्निध्यात बसवलिंगेश्वर महास्वामीजी विरक्त मठ अक्कलकोट, वेदमूर्ती बसय्या हिरेमठ कोगनूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. प्रारंभी गावातील प्रमुख मार्गावरून कळसाची मिरवणूक काढण्यात आली. यानंतर अक्कमहादेवी मूर्तीची महास्वामींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच शिवशंकर शिवाचार्य महास्वामींच्या हस्ते मंदिर लोकार्पण सोहळा पार पडला. या वेळी सिद्धारामेश्वर भजन मंडळ, मल्लिकार्जुन भजन मंडळ, प्रभुलिंगेश्वर भजन मंडळ, गंगाधरेश्वर अक्कमहादेवी भजन मंडळातील सदस्यांनी संगीत सेवा केली.
या वेळी प्रीतम बसवराज शटगार (सलगर) यांनी मंदिराला कळसारोहण अर्पण केला.
सिद्धारामेश्वर मंदिरचे पंचकमिटीचे अध्यक्ष प्रकाश सिद्रामप्पा उणणद यांच्या हस्ते भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.
---
दातृत्वाचे हात आले पुढे
स्व. गौराबाई हणमंत रब्बा यांच्या स्मरणार्थ सिद्धाराम तेग्गेळी यांनी गाभाऱ्यातील स्टाईल्स बसवून दिले. स्व. महादेवी शरणप्पा अडिगल व शरणप्पा धुंडप्पा अडिगल यांच्या स्मरणार्थ प्राचार्य ईरण्णा अडिगल यांच्या वतीने मंदिराला स्टाईल्स अर्पण करण्यात आले. अक्कमहादेवीची मूर्ती चौडप्पा कल्लप्पा हरळय्या यांच्या वतीने अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी शिवशरण पाटील, महादेव पोतदार, रमेश उप्पीन, चनबसय्या कोटगी, मल्लिनाथ फुलारी, सिद्धाराम तेग्गेळी, लिंगराज पाटील, कुर्ले, मल्लम्मा बुक्का, विजयालक्ष्मी पाटील, सुमन पोतदार, सिद्धम्मा भासगी, सखाराम पोतदार, लक्ष्मीपुत्र कुसगल, विश्वनाथ गंगा, सिद्धाराम रब्बा यांनी परिश्रम घेतले.
------
फोटो : २० अक्कलकोट ०२
तोळणूर येथील अक्कमहादेवी मंदिर लोकार्पण सोहळ्याप्रसंगी शिवशंकर शिवाचार्य महास्वामी, चन्नमल्ल महास्वामी, बसवलिंगेश्वर महास्वामी, प्रकाश उणणद, रमेश उप्पीन, चनबसय्या.