कुत्रा रस्त्यावर आडवा आल्यास कळेल दुरुनच; भटक्या टॉमीच्या गळ्यातही रिफ्लेक्टर बेल्ट

By शीतलकुमार कांबळे | Published: January 10, 2024 02:54 PM2024-01-10T14:54:19+5:302024-01-10T14:54:41+5:30

सोलापूर पेट ग्रुपचा उपक्रम : पहिल्या टप्प्यात ३०० बेल्ट बसविले.

If a dog crosses the road it will be known from a distance | कुत्रा रस्त्यावर आडवा आल्यास कळेल दुरुनच; भटक्या टॉमीच्या गळ्यातही रिफ्लेक्टर बेल्ट

कुत्रा रस्त्यावर आडवा आल्यास कळेल दुरुनच; भटक्या टॉमीच्या गळ्यातही रिफ्लेक्टर बेल्ट

सोलापूर : रस्त्यावरून जाताना अनेकदा कुत्रे आडव्या आल्यामुळे अपघात होतो. हा अपघात टाळण्यासाठी शहरातील श्वानप्रेमींनी भडक्या कुत्र्यांच्या गळ्यात रिफ्लेक्टर बेल्ट लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे यासाठी तामिळनाडूहून विशिष्ट प्रकारचे बेल्ट मागवण्यात आले आहेत. सोलापूर पेट ग्रुपतर्फे हा उपक्रम घेण्यात येत आहे.

वाहन चालवत असताना कुत्रा, मांजर किंवा इतर प्राणी आडवे आल्यास आपघात होतो. या अपघातात प्राणी तसेच वाहन चालकासही दुखापत होते. अनेकदा तर कायमचे अपंगत्व तसेच मृत्यू होण्याचाही धोका संभवतो. हे टाळण्यासाठी व वाहनचालक आणि प्राण्यांचा जीव वाचविण्यासाठी भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात रिफ्लेक्टर बेल्ट बसविण्यात येत आहे.

सुरज शाबादे या तरुणाने तामिळनाडू येथून हे बेल्ट मागविले आहेत. तिथल्या एका कंपनीकडे ऑनलाईन ऑर्डर दिल्यानंतर पहिल्या टप्प्यात ४०० बेल्ट मिळाले. हे बेल्ट भटक्या कुत्रे व मांजरांना लावण्यात येत आहे. सध्या विजापूर रोड, होटगी रोड, सात रस्ता, जुळे सोलापूर आदी भागातील भटक्या कुत्रे व मांजरांना बेल्ट लावले आहेत.
 
दुरुन चमकतो बेल्ट
कुत्रे व मांजराच्या गळ्यात बेल्ट लावल्यामुळे अंधारातही तो बेल्ट चमकतो. त्यामुळे वाहन दूर असले तरी त्याला बेल्ट चमकताना दिसतो. यामुळे वाहन चालक वाहनाचा वेग कमी करु शकतो. तसेच वाहन बंद करु शकतो. यामुळे संभाव्य अपघात टाळता येतो.

Web Title: If a dog crosses the road it will be known from a distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.