चावणारे कुत्रे मारले नाही तर कुटुंबाला फास देण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:21 AM2021-05-16T04:21:00+5:302021-05-16T04:21:00+5:30

गोडसेवाडी येथील सुशांत संजय कोळी यांनी पाळलेला पाळीव कुत्रा शेजारील दत्तात्रय सुखदेव कोळी यांच्या घरी पाळलेल्या कुत्र्याला चावू लागला. ...

If the biting dogs do not kill, the family is threatened | चावणारे कुत्रे मारले नाही तर कुटुंबाला फास देण्याची धमकी

चावणारे कुत्रे मारले नाही तर कुटुंबाला फास देण्याची धमकी

Next

गोडसेवाडी येथील सुशांत संजय कोळी यांनी पाळलेला पाळीव कुत्रा शेजारील दत्तात्रय सुखदेव कोळी यांच्या घरी पाळलेल्या कुत्र्याला चावू लागला. दरम्यान, या गोष्टीचा राग मनात धरून दत्तात्रय कोळी, ओंकार कोळी, ऋशिकेश कोळी हे तिघेजण सुशांत कोळी यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करू लागले. हे कुत्रे जर मारले नाही तर तुझ्या घरातील सर्वांना फास देऊन मारीन अशी दमदाटी केली. त्या तिघांनी एवढ्यावरच न थांबता हातात काठ्या घेऊन त्या कुत्र्याला शोधू लागले. त्यावेळी दत्तात्रय कोळी हे सुशांत कोळी याच्या पाठीवर काठीने मारहाण करीत होते. त्यावेळी सुशांतचे वडील संजय कोळी हे भांडण सोडविण्यासाठी मधे आले असता त्यांनाही डोक्यात, हातावर काठीने मारहाण करुन जखमी केले.

या भांडणात संजय कोळी यांच्या खिशातील मोबाईल फुटल्याने सुमारे १० हजार रुपयाचे नुकसान झाले. याबाबत सुशांत संजय कोळी (रा. गोडसेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दत्तात्रय सुखदेव कोळी, ओंकार बबन कोळी, ऋषिकेश बबन कोळी (रा. गोडसेवाडी, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: If the biting dogs do not kill, the family is threatened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.