३० दिवसांत बांधकाम परवाने न दिल्यास अधिकाऱ्यांची पगार कपात होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2022 12:54 PM2022-05-24T12:54:22+5:302022-05-24T12:54:25+5:30
सोलापूर महानगरपालिका आयुक्तांचा इशारा -ऑनलाइन परवान्यांबाबत घेतला आढावा
साेलापूर -महापालिकेला सादर झालेले बांधकामे परवान्यांचे अर्ज ३० दिवसांत निकाली न काढल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारात १० टक्के कपात हाेईल, असा इशारा आयुक्त पी. शिवशंकर यांनी साेमवारी दिला.
महापालिकेने गेल्या चार महिन्यांपासून बांधकाम परवाने ऑनलाइन देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी वास्तूविशारद, अभियंते, मनपा कर्मचारी यांची कार्यशाळाही घेतली हाेती. आयुक्तांनी साेमवारी या कामाचा आढावा घेतला. काही अर्ज अनेक दिवस प्रलंबित असल्याचे दिसून आले. एखाद्या नागरिकाने अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत या नागरिकाला परवाना मिळणार की नाही, यातील त्रुटी, त्रुटींची पूर्तता करण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती देणे अपेक्षित आहे. ही सर्व प्रक्रिया न करताच अर्ज प्रलंबित ठेवल्यास अधिकाऱ्यांच्या पगारातून १० टक्के कपात हाेईल. नगररचना कार्यालयातील काही आवेक्षकांना याबद्दल नाेटिसा दिल्या आहेत. महिनाअखेर अर्ज निकाली न निघाल्यास कारवाई सुरू हाेईल, असे आयुक्तांनी सांगितले.
--