नशा शराब में होता तो नाचती बोतल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:51 AM2019-03-25T10:51:03+5:302019-03-25T10:51:21+5:30

 कालच्या लोकमत मंथन पुरवणीतील ‘दारूचा पेट्रोल पंप’ बंद झाला त्याची कहाणी, हा लेख वाचला आणि मन पाच वर्षे मागे ...

If the drug was in liquor then the dancing bottle! | नशा शराब में होता तो नाचती बोतल !

नशा शराब में होता तो नाचती बोतल !

Next

 कालच्या लोकमत मंथन पुरवणीतील ‘दारूचा पेट्रोल पंप’ बंद झाला त्याची कहाणी, हा लेख वाचला आणि मन पाच वर्षे मागे गेले. 
   त्या बाई आॅफिसला आल्या. त्यांच्या दारूड्या मुलाच्या त्रासाला कंटाळून त्यांच्या सुनेने आत्महत्या केली होती, या आरोपावरून त्यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली होती. त्या बाईने प्रामाणिकपणे सांगितले की, वकीलसाहेब, माझी सून अतिशय चांगली होती. मुलगाच दारूडा आहे. त्याच्या व्यसनामुळेच माझ्या सोन्यासारख्या सुनेने आत्महत्या केली.

पोराला शिक्षाच व्हायला पाहिजे असे वाटते, परंतु काय करू ? पोटचं पोरगं आहे आणि आईची माया.  आपण काय करू पोराला खटल्याचा निकाल लागेपर्यंत जेलमध्येच बसू दे. म्हणजे त्याची दारू तरी सुटेल.  वाचक हो बघा, व्यसनमुक्तीचा नवीन फंडा ! ती पुढे म्हणाली - वकीलसाहेब, माझ्या मुलाला दारूडा बनवणाºया दारू विक्रेत्याला का सजा नाही हो ?  तिच्या या विलक्षण प्रश्नामुळे माझे मन चक्रावून गेले. या अनोख्या प्रश्नाने मी विचारात पडलो. केसमधून आरोपी सोडवणे फार सोपे होते, परंतु या बाईच्या प्रश्नाला उत्तर देणे फारच अवघड होते. 

    दुसºया एका खटल्यात दारूड्या पतीने पत्नीला झालेला मुलगा आपल्यासारखा दिसत नाही म्हणून काही दिवसातच चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा खून केला होता. सतत नशेत असलेला पती बाळंत झालेल्या पत्नीला भेटण्यास आला होता. त्यावेळी दारूच्या नशेत बाळाकडे बघून म्हणाला, माझ्यासारखा दिसत नाही. कोणाचा आहे हा ? वाचक हो! बाळंतपण हे पुनर्जन्मासारखे असते. काय वाटले असेल त्या ओल्या बाळंतिणीला. तिला कल्पना तर असेल का की, काही दिवसातच हा आपला नवरा आपला गळा घोटणार आहे. पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेणारा पती जन्मठेपेला गेला. त्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळाली. नवºयाच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून आत्महत्या केलेल्या त्या बाईचा मुलगा वर्षानंतर केसमधून सुटला. त्याची दारू पूर्णपणे सुटली. आता तो चांगला नागरिक झाला आहे. व्यसनमुक्तीचा हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी झाला.  

     परंतु त्या बाईने माझ्या मुलाला दारूडा बनवणाºया दारू विक्रेत्याला का सजा नाही हो ? या प्रश्नास मला पाच वर्षांनी कालच्या ‘लोकमत’मधील ‘मंथन’ पुरवणीतील ‘दारूचा पेट्रोल पंप’ बंद झाला त्याची कहाणी हा लेखाने उत्तर मिळाले.  ज्या ठिकाणी दारू पाण्यासारखी वाहत होती, त्या गडचिरोली जिल्ह्यातील काकडयेली गाव दारूमुळे पुरतं बदनाम झालं होतं. याच गावात आज दारूचा थेंबही विकला जात नाही. या लेखाचे सर्व गावात सामुदायिक वाचन झाले. दारूमुळे सर्वाधिक हाल होतात त्या महिला आणि लहान मुलांचे. निर्धारपूर्वक गावात दारूबंदी झाली तर अनेक स्त्रियांचे संसार वाचणार आहेत, अनेक स्त्रियांचे अकाली पुसले जाणारे कुंकू कायम राहणार आहेत. आज दारूमुळे असंख्य संसार बरबाद होत आहेत.

दारूडे ज्यावेळी नशेत बायकोला मारतात त्यावेळी त्या बायकोने दिलेल्या शापाची नोंद त्या दारू विक्रेत्याच्या खात्यात विधाता निश्चितच करीत असणारच!  दारू पिणाºयाचा कधीही फायदा होत नाही. त्याचे जीवन दारूच्या प्रत्येक घोटाने तोट्यातच जात असते. फायदा होत असतो तो फक्त त्या दारू विक्रेत्याचाच. कोणी कोणता व्यवसाय करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पैशासाठी दारू विकणाºयांना पैशाच्या प्राप्तीबरोबरच येणारे शिव्याशाप त्यांची मन:शांती ढवळतात की नाही हा संशोधनाचा विषय आहे.  दारूड्यांच्या त्रासामुळे त्यांच्या घरच्यांनी दिलेल्या तळतळाटाचा परिणाम निश्चितच ब्रह्मसंबंधासारखा असतो. लक्ष्मीचे तीन प्रकार आहेत. अनीतीने मिळवली जाते ती अलक्ष्मी असते. त्यामुळे विनाश होतो. जी संपत्ती नीतीने मिळते ती लक्ष्मी असते. त्यामुळे विलास येतो. नीती, प्रीती आणि रितीने मिळवले जाते, ती महालक्ष्मी असते.  तिच्यामुळे खरा विकास होतो, याची सर्वांनी नोंद घेणे अत्यंत जरुरीचे आहे.

    दारूच्या रंगीत बाटलीतील रंगीत निष्क्रीय राक्षसाला दारूच्या बाटलीतच राहू द्यावे. त्याला जर तुम्ही तुमच्या डोक्यात जाऊ दिले तर तुमची बरबादी ठरलेलीच समजा.      
अमिताभ बच्चन म्हणतो ‘नशा शराब में होता तो नाचती बोतल!’ तुमच्या नशिबाला नाचवणाºया त्या नशेला बाटलीतच राहू द्या. (समाप्त)
-अ‍ॅड. धनंजय माने 
(लेखक हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत.)

Web Title: If the drug was in liquor then the dancing bottle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.