वीज बिल भरले नाही तर ट्रान्सफार्मर करणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:20 AM2021-02-15T04:20:42+5:302021-02-15T04:20:42+5:30
घरगुती व शेतीपंपाचे वीज बिल मोठ्या प्रमाणावर थकल्याने शासनाने धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांचे सर्व्हिस ...
घरगुती व शेतीपंपाचे वीज बिल मोठ्या प्रमाणावर थकल्याने शासनाने धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांचे सर्व्हिस कनेक्शन आहे. त्यांनी तात्काळ कोटेशन भरुन कनेक्शन घ्यावे. चार पोलपर्यंत अंतर असलेल्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने पोल, तारा टाकून वीज कनेक्शन घ्यावे. शेतकऱ्यांना बिलातून पैसे परतफेड करुन घेण्याची सवलत शासनाने दिली आहे. यापुढे खराब (जळालेल्या) झालेल्या ट्रान्सफार्मरवरील किमान ८० टक्के शेतकऱ्यांनी वीज बिल भरले तरच ट्रान्सफार्मर बदलून देण्याच्या सूचना आहेत. महावितरण आपल्या दारी योजनेत दोन पोलपर्यंतच्या अंतरासाठी केबल कनेक्शन देण्यात आले आहेत. तालुक्यातील अशा ७२० कनेक्शनधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रस्ताव मंजुरीला पाठविल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी ५२ कोटी भरावेत
उत्तर सोलापूर तालुक्यातील १३ हजार ८६ शेती कनेक्शनची १४९ कोटी ३७ लाख रुपये इतकी थकबाकी आहे. यापैकी दंड व व्याजाची ४५ कोटी इतकी रक्कम माफ केली आहे. उर्वरित १०४ कोटी थकबाकीच्या ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरली तर ५० टक्के रक्कम माफ होणार आहे.
एखाद्या गावातील संपूर्ण शेतकऱ्यांनी सवलतीप्रमाणे वीज बिल चुकते केले तर भरलेल्या बिलाच्या ३३ टक्के रक्कम गावासाठी राखीव ठेवली जाणार आहे. ही रक्कम गावातील विजेच्या कामासाठी खर्च केली जाणार आहे.
कोट
आमदार यशवंत माने यांनी
तालुक्यातील मार्डी व पडसाळी येथे नवीन उपकेंद्र तसेच तालुक्यात नवीन ७० ट्रान्सफार्मर प्रस्तावित केले आहेत. यामध्ये सर्वाधिक १० ट्रान्सफार्मर बीबीदारफळ गावासाठी आहेत.
- संतोष कैरमकोंडा,
उपकार्यकारी अभियंता