मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी घेतल्यास कारवाई! -सहायक आयुक्त नागनाथ चौगुले

By संताजी शिंदे | Published: August 12, 2023 05:45 PM2023-08-12T17:45:08+5:302023-08-12T17:45:21+5:30

"महाविद्यालयांनी सूचनेचे पालन करावे"

If fees are taken from backward class students, action will be taken! - Nagnath Chaugule | मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी घेतल्यास कारवाई! -सहायक आयुक्त नागनाथ चौगुले

मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी घेतल्यास कारवाई! -सहायक आयुक्त नागनाथ चौगुले

googlenewsNext

संताजी शिंदे, सोलापूर: सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाची प्रवेशप्रक्रिया अद्यापही सुरू आहे. जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक, तांत्रिक, वैद्यकीय, बिगर व्यावसायिक महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची रक्कम घेऊ नये. अन्यथा संबंधित संस्थेवर कारवाई केली जाईल, अशी माहिती समाजकल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या वतीने समाजकल्याण कार्यालयामार्फत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. सर्व योजना शासनामार्फत mahadbtmahait.gov.in या प्रणालीवरून ऑनलाइन राबविण्यात येत आहेत.

नवीन प्रवेश करतेवेळी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत करण्यात येणाऱ्या केंद्रीयभूत प्रवेशप्रक्रियेच्या (कॅप) माध्यमातून प्रवेश दिला जातो. प्रवेश मिळणाऱ्या उमेदवारांना त्याच्या संवर्गाप्रमाणे शासनस्तरावरून महाडीबीटी प्रणालीवरून शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी पोर्टलद्वारे महाविद्यालयास दिली जाईल. त्यामुळे प्रवेशावेळी संबंधित विद्यापीठ, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, तंत्रनिकेतन यांनी कोणत्याही मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची रक्कम घेऊ नये. अन्यथा प्रचलित नियमानुसार प्रशासकीय व शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा सहायक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी दिला आहे.

Web Title: If fees are taken from backward class students, action will be taken! - Nagnath Chaugule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.