फोटो काढण्याऐवजी रुग्णालयात दाखल केले असते तर ब्रह्मदेवचा वाचला असता जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:49 AM2019-06-28T10:49:19+5:302019-06-28T10:51:56+5:30

दुचाकीस्वारांना धडक देऊन पळून गेलेल्या जीपचा लागला शोध; टाकळी अपघातातील मोटरसायकलस्वाराचा झाला मृत्यू

If instead of taking photographs, if he had been admitted to the hospital, the creatures would have survived Brahmadev | फोटो काढण्याऐवजी रुग्णालयात दाखल केले असते तर ब्रह्मदेवचा वाचला असता जीव

फोटो काढण्याऐवजी रुग्णालयात दाखल केले असते तर ब्रह्मदेवचा वाचला असता जीव

Next
ठळक मुद्देविजयपूर महामार्गावर टाकळी पुलावर जीपने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या मोटरसायकलस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यूउशिराने एका प्रवाशाने जखमींना रुग्णालयात दाखल केले, पण उपचारादरम्यान ब्रह्मदेव लक्ष्मण गुमटे (रा. शिरनाळ) याचा मृत्यू झाला

मंद्रुप : विजयपूर महामार्गावर टाकळी पुलावर जीपने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या मोटरसायकलस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर नागरिकांनी जखमींचे फोटो काढत बसण्याऐवजी तातडीने मदत करावी, मदत करणाºयांची कोणतीही चौकशी केली जात नाही, अशी माहिती मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांनी दिली.

मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता टाकळी येथील भीमा नदीच्या पुलावर सोलापूरकडून विजयपूरकडे भरधाव निघालेल्या के.ए.१६/एम १३४९ या क्रमांकाच्या जीपने समोरून येणाºया मोटरसायकलीस ठोकरले. जीप इतकी वेगात होती मोटरसायकलीस धडक दिल्यानंतर फरपटत कर्नाटक हद्दीपर्यंत गेली. अपघातानंतर जीप चालकाने वाहनासह पळ काढला. घटना पाहणाºया लोकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यास मदत न करता मोबाईलवर फोटो काढण्यात धन्यता मानली. उशिराने एका प्रवाशाने जखमींना रुग्णालयात दाखल केले, पण उपचारादरम्यान ब्रह्मदेव लक्ष्मण गुमटे (रा. शिरनाळ) याचा मृत्यू झाला. 

मयत ब्रह्मदेव व नागेंद्र मदगोंडा माशाळ (दोघे रा. शिरनाळ, ता. इंडी) हे एमएच १३/ एस ६१0१ या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून मंद्रुपकडे निघाले होते. टाकळी पुलावर समोरून येणाºया जीपने त्यांना ठोकरले. धडक बसल्यानंतर मोटरसायकल जीपमध्ये अडकली व दोघांना तसेच फरफटत ओढत नेली. यात रक्तस्त्राव होऊन दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर सिद्राम माशाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंद्रुप पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार आसादे करीत आहेत. जीपचालकच फरार असून जीप ताब्यात घेण्यात आली आहे. 

फोटोपेक्षा माणुसकी दाखवा
माणसाचा जन्म एकदाच मिळतो. त्यामुळे अपघातात एखादा जखमी झाल्यास त्याला तातडीने वैद्यकीय मदत देण्यासाठी प्रयत्न करा. मोबाईलवर फोटो काढण्यापेक्षा आपले कर्तव्य बजावा. फोटो क्लिक करण्याऐवजी १0८ वर डायल करून अपघाताची माहिती द्या. शक्य असेल तर जखमीवर प्रथमोपचार करा,जवळच्या दवाखान्यात तातडीने न्या. अशा तत्परतेमुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. पण अलीकडे मोबाईलवर फोटो काढण्याचे फॅड वाढले आहे, या प्रवृत्तीला पायबंद हवा. पण सोशल मीडियावर वारंवार अशा गोष्टी पाहून माणसांना अशी सवय जडू लागली आहे.
- डॉ. विठ्ठल धडके

कायद्याचे आहे संरक्षण
पूर्वी अपघातात मदत करणाºयांना पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा लागायचा. साक्षीदार, कोर्टाचे हेलपाटे मारावे लागतील या भीतीने लोक जखमींना मदत करण्यास धजावत नसत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जखमींना मदत करणाºयांची जादा चौकशी करू नये किंवा त्यांना मनस्ताप होईल अशा गोष्टी करू नयेत असे निर्देश दिले आहेत. खरे तर जखमींना मदत हे प्रत्येकाचे कर्तव्य, सामाजिक बांधिलकी आहे. पण अलीकडे लोक लगेच मोबाईलवर फोटो काढून सोशल मीडियावर ती घटना व्हायरल करण्यात धन्यता मानतात, हे वाईट आहे.
- अ‍ॅड. शशी कुलकर्णी

Web Title: If instead of taking photographs, if he had been admitted to the hospital, the creatures would have survived Brahmadev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.