ठरलं तर, सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी सरपंच, उपसरपंच निवडीचा गुलाल....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:03 PM2021-02-18T17:03:15+5:302021-02-18T19:07:16+5:30

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आदेश

If it is decided, Sarpanch, Deputy Sarpanch will be elected in Solapur district on Tuesday ....! | ठरलं तर, सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी सरपंच, उपसरपंच निवडीचा गुलाल....!

ठरलं तर, सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी सरपंच, उपसरपंच निवडीचा गुलाल....!

googlenewsNext

सोलापूर -  सोलापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडीला अखेर  मुहूर्त मिळाला आहे.  सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडी संबंधी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आदेश काढले आहेत. 23 फेब्रुवारीला सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जाहीर केला आहे. 

सरपंच पद आरक्षणावर आक्षेप घेतलेल्या आठ तालुक्यातील २२ हरकतींवर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. सुनावणीदरम्यान या तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवड कार्यक्रमाला स्थगिती दिली होती. ८ पैकी ४ तालुक्यातील हरकती फेटाळल्या.
स्थगिती मागे घेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी  ४ तालुक्यात मंगळवार २३ फेब्रुवारी रोजी सरपंच, उपसरपंच निवड कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिलेत.

यामुळे ४ तालुक्यातील अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला. आता मंगळवारी सरपंच, उपसरपंच निवडीचा गुलाल उधळणार असल्याने याची उत्सुकता ग्रामीण भागात लागून राहिली आहे. माढा, दक्षिण सोलापूर, मोहोळ, माळशिरस या चार  तालुक्यात मंगळवारी २३ फेब्रुवारी सरपंच, उपसरपंच निवडीचा गुलाल उधळणार आहेत. ३ दिवस अगोदर संबंधित गावांना तहसीलदारांनी नोटीस पाठवावेत. त्याच दिवशी सभा बोलावून निवड कार्यक्रम राबवा, असे आदेशात म्हटले आहे.

अक्कलकोट, सांगोला, बार्शी आणि पंढरपूर या तालुक्यातील हरकतींचे काय झाले?. अशी विचारणा संबंधित तालुक्यातून होत आहे. त्यामुळे या चार तालुका बाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत.

 

Web Title: If it is decided, Sarpanch, Deputy Sarpanch will be elected in Solapur district on Tuesday ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.