फक्त वैरण घरची असली की, आपण नोकरदारांनाही जमू देत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:19 AM2020-12-24T04:19:59+5:302020-12-24T04:19:59+5:30

आपणास सरकारी नोकरीची आवड आणि हौस होती ; पण नोकरी लागली नाही म्हणून हताश न होता दुधाचा आधुनिक पद्धतीने ...

If it's just fodder, you don't even let the servants gather! | फक्त वैरण घरची असली की, आपण नोकरदारांनाही जमू देत नाही!

फक्त वैरण घरची असली की, आपण नोकरदारांनाही जमू देत नाही!

Next

आपणास सरकारी नोकरीची आवड आणि हौस होती; पण नोकरी लागली नाही म्हणून हताश न होता दुधाचा आधुनिक पद्धतीने व्यवसाय करण्याचे ठरविले. त्यासाठी टप्प्याटप्प्याने कालवडी व गायी खरेदी केल्या. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने आज शेती करत करत गायी सांभाळतोय. माझी प्रत्येक गाय बारा ते पंधरा लीटर दूध देते. आज दुधाला भाव कमी आहे तरी जास्त दूध देणाऱ्या गायी सांभाळत असल्याने पैसे राहतात. दिवसभरातून गायींना फक्त दोन वेळाच कुट्टी करून वैरण टाकली जाते.

एका गायीसाठी दिवसभरासाठी साधारणतः वीस ते पंचवीस किलो चारा दिला जातो. साधारणतः आठ ते दहा किलो सुग्रास व भरडा दिला जातो. सध्या दुधाला २५ ते २६ रुपये भाव मिळतो. ३५ ते ४० रुपये भाव मिळण्याची गरज आहे. आमच्या तीस गायी आहेत. गणेश, अमोल अशी भावंडे मिळून हा व्यवसाय आम्ही करतो. तरुणांच्या हाताला रोजगार आणि शेतीला खत देणारा हा व्यवसाय आहे, असेही दाढे यांनी सांगितले.

------

योग्य नियोजन करून आधुनिक पद्धतीने, निष्ठेने स्वत: कष्ट करण्याची तयारी ठेवून दुधाचा व्यवसाय करून कालवडींची पैदास केली तर तो खूप परवडणारा आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता दुधाचा व्यावसाय केला पाहिजे आणि सरकारने दुधाला चाळीस रुपये भाव दिला तर हा व्यवसाय नक्कीच खूप आर्थिक फायदा मिळवून देणारा आहे, असे दूध उत्पादक सागर दाढे यांनी सांगितले.

Web Title: If it's just fodder, you don't even let the servants gather!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.