माघी वारी टाळली तर भावी यात्रा सुखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:39 AM2021-02-06T04:39:20+5:302021-02-06T04:39:20+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारी माघी यात्रा कशी असेल, असा प्रश्नावर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. तेजस्वी सातपुते म्हणाल्या, माघी यात्रेलाही ...

If Maghi Wari is avoided, the future journey will be smooth | माघी वारी टाळली तर भावी यात्रा सुखर

माघी वारी टाळली तर भावी यात्रा सुखर

googlenewsNext

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारी माघी यात्रा कशी असेल, असा प्रश्नावर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. तेजस्वी सातपुते म्हणाल्या, माघी यात्रेलाही इतर जिल्ह्यांतून दिंड्या येतात. त्यातील काही दिंड्या मोठ्या असतात. यामुळे भाविकांची गर्दी पंढरपुरात होऊन कोरोनाचा प्रसार होईल. यामुळे धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी गर्दी टाळणे अत्यंत आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनावर कंट्रोल आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. लवकर कोरोनामुक्त व्हायचे असेल तर आणखी काही काळ नियम पाळणे गरजेचे आहे. स्थानिक लोकांनीदेखील मंदिरात गर्दी करणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर बाहेरचे लोक मंदिरात आले नाही तर कोरोनावर आपल्याला मात करता येईल.

जिल्हा प्रवेश मार्ग, पंढरपूर तालुका प्रवेश मार्गावर पोलिसांची नाकाबंदी करण्याबाबत व कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे. आषाढी व कार्तिकी यात्रा मर्यादित स्वरुपाची झाली. त्याच पद्धतीने माघी यात्रादेखील मर्यादित स्वरुपाची होेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

----

एक दिवस संचारबंदीचा विचार सुरू

माघी यात्रेतील दशमी व एकादशी दिवशी विठ्ठलाचे दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने घेतला आहे. यात्रेतील गर्दी टाळण्यासाठी उपाय योजना करण्याबाबत पोलीस व प्रशासनामध्ये चर्चा सुरू आहे. माघी एकादशी दिवशी एक दिवस संचार बंदी करण्याबाबत ही चर्चा सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

Web Title: If Maghi Wari is avoided, the future journey will be smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.