आषाढी सोहळ्यास परवानगी मिळाली, तर मंदिर समिती सुविधा देईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:16 AM2021-06-03T04:16:38+5:302021-06-03T04:16:38+5:30
गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीच्या सदस्या ॲड. माधवी निगडे ...
गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीच्या सदस्या ॲड. माधवी निगडे यांनी लोकमतशी संवाद साधला.
माधवी निगडे म्हणाल्या, सध्या महाराष्ट्रभरातून वारकरी व मानाच्या संतांच्या पालख्या व इतरही येणाऱ्या पालख्या या पायी आषाढी सोहळ्याबाबत आग्रही आहे. मंदिर समितीनेही त्यादृष्टीने सकारात्मक विचाराने वारी सोहळा मर्यादित स्वरुपात साजरा करण्याचे नियोजन व प्रस्ताव तयार करायला हवा.
वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. शासनाने पायीवारी सोहळ्याला मर्यादित संख्येत परवानगी दिली तर आपण शासनाला या वारकऱ्यांसाठी विविध सुविधा पुरवण्याची तयारी ठेवू शकतो असा प्रस्ताव द्यावा. कोणत्याही परिस्थितीत स्वत:हून मंदिर बंद ठेवण्याचा प्रस्ताव देऊ नये, असे विषय मंदिर
----भंडीशेगाव ग्रामपंचायतीकडून पत्र
यावर्षीचा आषाढी सोहळ्याचा मुक्काम आमच्या गावी असल्यास त्यासंदर्भात सर्व परिस्थितीचा साधकबाधक विचार करून मर्यादित संत मंडळी, वारकरी व प्रशासकीय मंडळी मर्यादित असल्यास पालखी सोहळा घेण्यास ग्रामस्थांची कोणतीही हरकत नाही. ५०० वारकरी व ५०० प्रशासकीय कर्मचारी, गावकरी, प्रतिनिधी अशा मर्यादित स्वरूपाचा असावा. मुक्कामाच्या तळावर सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ. सर्व नियम पाळून मर्यादित लोकांमध्ये अखंड परंपरा सोहळ्याचे पारंपरिक नियोजन व्हावे. त्याचप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने घेतलेले निर्णय व शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे गावकरी पालन करतील, असे पत्र ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीला भंडीशेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच मंजुषा यलमार यांनी दिले आहे.
--------