अवैध धंदेवाल्याशी पोलीस कर्मचाºयांचा संपर्क असल्यास बडतर्फीची कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 07:09 PM2020-10-22T19:09:42+5:302020-10-22T19:10:19+5:30
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा इशारा; करमाळा पोलीस ठाण्याला दिली भेट
करमाळा : पोलिसांनो..तुमची वर्तणूक चांगली ठेवा, अवैध धंदेवाल्याशी तुमचा संपर्क असता कामा नये़ तसे आढळून आल्यास मी बडतर्फीची कारवाई करीन असा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आज करमाळा येथे पोलीस ठाण्यास भेट देउन पोलिसांशी संवाद साधताना दिला.
जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आज दुपारी करमाळा पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलीस ठाण्यातील कामकाजाची पाहणी करून पोलिसांशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, पोलीस ठाण्यात येणा-या प्रत्येक नागरिकांची तुम्ही दखल घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या तक्रारीची नोंद घेतली पाहिजे. समाजात वावरताना तुमची वर्तणूक चांगली ठेवली पाहिजे अन्यथा तुमच्या गैरवर्तणुकीमुळे पोलिसाची प्रतिमा खराब होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल हिरे, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे उपस्थित होते.
------------
अवैध धंदे सुरू असल्यास थेट मला संपर्क करा...
करमाळा शहर व तालुक्यात बेकायदेशीर दारू, मटका, जुगार, अवैध वाळू धंदे वेगात सुरू आहेत, त्यामुळे क्राईम वाढले आह़े, अशा तक्रारी देवानंद बागल, सुहास घोलप, महेश चिवटे यांंनी केल्या असता त्यावर जिल्हा पोलीस प्रमुख सातपुते यांनी स्थानिक अधिकारी यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्यास अवैध धंद्याबाबत थेट माझ्याकडे संपर्क साधा आपण कारवाई करू असे सांगितले.