शेतीपंपाचे वीज कनेक्शन न जोडल्यास तीव्र आंदोलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:26 AM2021-08-24T04:26:47+5:302021-08-24T04:26:47+5:30
माढा : कृषी पंपाची वीज बिले न देता महावितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडल्यामुळे फळबागा व पिकांचे नुकसान ...
माढा : कृषी पंपाची वीज बिले न देता महावितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडल्यामुळे फळबागा व पिकांचे नुकसान व पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, तत्काळ वीज कनेक्शन न जोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी दिला आहे.
तहसीलदार राजेश चव्हाण यांना मतदारसंघातील शेतक-यांच्या वतीने निवेदन दिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे, अप्पासाहेब उबाळे, उपसभापती धनाजी जवळगे, माढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रमेश पाटील, कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे, कैलास तोडकरी, दिलीप भोसले, तानाजी देशमुख, रामचंद्र भांगे, संभाजी पाटील, उल्हास राऊत, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण, संदीप पाटील, सुभाष नागटिळक, नगरसेवक चंद्रशेखर गोटे, हनुमंत पाडुळे, मोहन मोरे, नागनाथ पाटील आदी उपस्थित होते.
---
फोटो : २३ माढा
तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे. बाजूला सुहास पाटील, रमेश पाटील, झुंजार भांगे