राज्याचे देणे वेळेवर दिल्यास केंद्राकडे मदत मागण्याची वेळच येणार नाही : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 12:53 PM2020-10-19T12:53:51+5:302020-10-19T12:53:55+5:30
सरकार कुणालाही वाºयावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचे आपत्तीग्रस्तांना आश्वासन
सोलापूर : केंद्र सरकारने राज्याचे देणे वेळेवर दिले तर आम्हाला केंद्राकडे मदत मागण्याची वेळच येणार नाही़ केंद्र व राज्य असा दुजाभाव विरोधी पक्षांनी करू नये, कारण एकेकाळी तेही सत्तेवर होते़ राज्य सरकार जे जे शक्य आहे ते करणारच आहे, आपत्तीग्रस्तांना वाºयावर सोडणार नाही असे मत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यकत केले.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी, करमाळा, माढा, सांगोला, मंगळवेढा व उत्तर सोलापूर या तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. तर एकाच या भागाला त्याचा मोठा फटका बसला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दौºयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूर दौºयावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूरहून थेट अक्कलकोटला पोचले. सांगवी खुर्द येथील बोरी नदीवरील पुलाची पाहणी करून शेतकºयांची संवाद साधला़ यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी, शेतकºयांची निवेदने स्वीकारली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आताही हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे़ सुदैवाने आज उघडीप आहे़ सर्व जनतेला दिलासा देतो आहोत, प्राणहानी होता कामा नये ही आमची भावना आहे़ पाऊस पुन्हा येऊ नये अश्ी माझी प्रार्थना आहे़ मात्र जी परिस्थिती उध्दभवली आहे ती सावरण्यासाठी सरकार कुठेही मागे राहणार नाही, पंचनामे सुरू आहेत, माहिती घेत आहोत, मदतीला सुरूवातही केली आहे़ आम्ही फक्त माहिती घेत बसणार नाही, आम्ही कुणालाही वाºयावर सोेडणार नाही असेही ते शेवटी म्हणाले़