पोलिस लोकप्रतिनिधींना टार्गेट करीत असतील तर बार्शी ठाण्यावर मोर्चा काढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 12:31 PM2022-03-25T12:31:13+5:302022-03-25T12:31:18+5:30

देवेंद्र फडणवीसांनी दिला इशारा : विधीमंडळाच्या सभागृहात दिला इशारा

If the police are targeting the people's representatives, then we will form a morcha at Barshi police station | पोलिस लोकप्रतिनिधींना टार्गेट करीत असतील तर बार्शी ठाण्यावर मोर्चा काढू

पोलिस लोकप्रतिनिधींना टार्गेट करीत असतील तर बार्शी ठाण्यावर मोर्चा काढू

googlenewsNext

बार्शी : बार्शीचे भाजप समर्थक अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीतील अवैध धंद्यांच्या पुराव्यांनिशी तक्रारी केल्या म्हणून जर तेथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आमदार व त्यांच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे नियोजन करून टार्गेट करत असेल तर हे बरोबर नाही. पोलीस अशाप्रकारे एखाद्या लोकप्रतिनिधीला वागणूक देत असतील तर मी स्वतः बार्शी पोलीस स्टेशनवर हजारोंचा मोर्चा घेऊन घेराव घालेन, असा इशारा देत जे चाललं आहे ते योग्य नाही, अशी खंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना व्यक्त केली.

सभागृहात बोलताना फडणवीस म्हणाले, विधिमंडळाच्या सभागृहात सदस्यांनी बोलल्यानंतर प्रशासन जर दुःख धरणार असेल तर सदस्याने बोलायचं की नाही, असा प्रश्न उपस्थित होतोय. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी तिथल्या अवैध व्यवसायांच्या संदर्भात विषय मांडला. या सभागृहामध्ये राज्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन त्यांनी बैठक घेतली. त्याच्यात लोकप्रतिनिधी आले. त्यांनी काही पुरावे देत तक्रारी केल्या. कसे अवैध धंदे चालतात हे सांगितले.

त्यानंतर या लोकप्रतिनिधींना अक्षरशः टार्गेट करण्याचं काम चाललं आहे. राजेंद्र राऊत यांना कुठल्या तरी गुन्ह्यात घेणार आणि त्यांच्या मुलाला शंभर टक्के फसवणार असं त्यांचं नियोजन आहे. ‘त्या’ पीआयचे रेकॉर्ड काय? कितीदा सस्पेंड झालेत आणि कशा कशात सस्पेंड झालेत हे पहा, असे पीआय जर आपण तिथे देत असाल आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली छानपणे सगळे अवैध धंदे चालत असतील तर काय आमदारांनी गप्प बसायचं, मूग गिळून गप्प बसायचं का ? असा सवाल उपस्थित केला.

दंडुकेशाही चालू देणार नाही...

अशाप्रकारे जर या सभागृहामध्ये बोललो म्हणून किंवा सभागृहाच्या अंतर्गत एखाद्या बैठकीचा संदर्भ दिला म्हणून जर लोकप्रतिनिधींवर पोलीस अशाप्रकारे दंडुकेशाही करत असतील तर मी आज तुम्हाला सांगतो त्यांच्या मुलाचा जीव धोक्यात आहे तसे पत्र दिले आहे. काही कारवाई होणार नाही हे आम्हाला माहीत आहे. मी ठरवलं आहे. अशा प्रकारची वागणूक जर मिळणार असेल मी स्वतः त्या ठिकाणी जाईन. हजारोंचा मोर्चा घेऊन त्या पोलीस स्टेशनला घेराव घालेन, असा इशाराही फडणवीसांनी दिला. या सभागृहातील आमचे अधिकार जर अशा प्रकारे डावलले जात असतील तर योग्य नाही. पोलिसांना जर वाटत असेल की आपल्याला संरक्षण आहे तर हे योग्य नाही आणि कुठल्यासंदर्भात योग्य नाही. अध्यक्ष महोदय काय अवस्था आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

Web Title: If the police are targeting the people's representatives, then we will form a morcha at Barshi police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.