तर रेल्वेतील चेंगराचेंगरी रोखू शकेल !
By admin | Published: May 20, 2014 01:07 AM2014-05-20T01:07:15+5:302014-05-20T01:07:15+5:30
इंद्रायणीचीच अधिक भीती : मुंबई-पुणे-सोलापूर गाडीला एकच क्रमांक असावा
सोलापूर : पुण्यात इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर रेल्वे प्रशासन, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे जवान अलर्ट झाले आहेत. दरम्यान, गाडी एकच मात्र तिचे काही अंतरांपर्यंत वेगवेगळे क्रमांक असल्यामुळे ही घटना घडल्याच्या प्रतिक्रिया रेल्वे प्रवाशांमधून ऐकावयास मिळाल्या. मुंबई-पुणे ही गाडी २२१५ या क्रमांकाने धावते. पुढे ती पुणे-सोलापूर इंद्रायणी म्हणून धावताना तिचा क्रमांक बदलला जातो. सोलापूरपर्यंत इंद्रायणी एक्स्प्रेसचा क्रमांक असतो तो २२१७०. दुपारी दीड ते पावणेदोनच्या दरम्यान इंद्रायणी सोलापूरला येते. ती काही वेळानंतर पुन्हा पुण्याकडे मार्गस्थ होते. मार्गस्थ होणार्या या गाडीचा क्रमांक पुन्हा बदलला जातो. दुपारी दोन वाजता सुटलेली इंद्रायणी पुढे मुंबईकडे जाते. त्यावेळी तिचा क्रमांक २२१० असा होतो. काही जणांना सोलापूरहून मुंबईकडे जावे लागते. इंद्रायणी गाडीतून जर प्रवास करावयाचा असेल तर त्याला पुणेपर्यंतच प्रवास मिळतो. पुन्हा त्याला तिकीट काढून पुढचा प्रवास करावा लागतो. एकूणच सातत्याने बदलत असलेल्या गाडी क्रमांकाचा फटकाही बसतो. शिवाय मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडण्याची शक्यता असते. जी गाडी मुंंबईहून पुण्याला धावते. तीच गाडी इंद्रायणी नावाने पुढे सोलापूर आणि लगेच पुण्याला रवाना होते, त्या गाडीचा क्रमांक कायम ठेवला तर दुर्घटना टळू शकेल, असा अंदाज जिल्हा प्रवासी संघाचे अध्यक्ष हर्षद मोरे, उपाध्यक्ष संजय पाटील, सोलापूर रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ जाधव आदींनी वर्तवला आहे.
--------------------------
लोहमार्ग, आरपीएफ पछाडत आहेत जंग जंग ४पुण्याहून सोलापूरला तर सोलापूरहून पुण्याला जाणार्या प्रवाशांची संख्या वाढतच असते. पुण्याहून सोलापूरला येणार्या इंद्रायणीतून उतरणार्या आणि गाडीत प्रवेश मिळण्यासाठी प्रवासी आमने-सामने भिडत असतात. यातून मोठ्या प्रमाणावर गोंधळ तर उडतोच शिवाय काही दुर्घटना घडण्याची भीती अधिक असते. इंद्रायणी येण्याच्या आणि जाण्याच्या वेळेत लोहमार्ग आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे जवान आपल्या परीने गर्दीवर नियंत्रण आणतात खरे. मात्र शेवटी प्रवाशांचेही काही कर्तव्य आहे.