जाचक वीज बील वसुली न थांबविल्यास उद्या टेंभुर्णीत रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:21 AM2021-03-21T04:21:21+5:302021-03-21T04:21:21+5:30
जिल्हाधिकारी सोलापूर व अधीक्षक अभियंता महावितरण सोलापूर यांना दिलेल्या निवदनात त्यांनी म्हटले आहे की, सर्वत्र वीज बिलाची थकबाकी ...
जिल्हाधिकारी सोलापूर व अधीक्षक अभियंता महावितरण सोलापूर यांना दिलेल्या निवदनात त्यांनी म्हटले आहे की, सर्वत्र वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी जोरदार मोहीम सुरू आहे. वीज बिल वसूल व्हावे म्हणून पूर्णपणे लाईट बंद केली जाते. त्यामुळे ज्या लोकांनी पैसे भरले आहेत किंवा पूर्वीपासून सर्व बिले वेळेवर भरलेली आहेत, अशा शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. एखाद्या ट्रान्सफार्मरचे अर्धे शेतकरी पैसे भरू शकत नाहीत. यामुळे शेतकऱ्याच्या वाद होत आहेत.
त्यामुळे वीज बंद करून थकबाकी वसूल करण्यापेक्षा वीज सुरू ठेवून थकबाकी वसुली करावी. जे शेतकरी मुद्दामहून पैसे भरत नाहीत अशा लोकांची वीज खंडित करावी. आपल्या मोहिमेचा त्रास जे नियमित बिल भरतात व शासनाच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी तयार आहेत त्यांना होत आहे.
सध्या उन्हाळा खूप कडक असून सर्वच पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना बिलाचे टप्पे पाडून द्यावेत. वसुलीची पद्धत न बदलल्यास सोमवार २२ मार्च रोजी सकाळी संभाजी महाराज चौक येथे पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात येईल, असे संजय कोकाटे यांनी पत्रकारांना सांगितले.