गर्दी कराल तर खरेदीचा हक्क हिरावून बसाल;‘लक्ष्मण रेषा’ पाळाल तर हसत-खेळत घरी जाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 10:56 AM2020-03-26T10:56:39+5:302020-03-26T10:59:12+5:30

सोलापूरकरांना हवीय शिस्तीची गरज : एकीकडे भाजी मंडईत तुफान गर्दी तर दुसरीकडे किराणा दुकानासमोर रेषा

If you follow the 'Laxman Rekha' then you will go home with a smile! | गर्दी कराल तर खरेदीचा हक्क हिरावून बसाल;‘लक्ष्मण रेषा’ पाळाल तर हसत-खेळत घरी जाल !

गर्दी कराल तर खरेदीचा हक्क हिरावून बसाल;‘लक्ष्मण रेषा’ पाळाल तर हसत-खेळत घरी जाल !

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये असे वाटत असेल तर नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येणे टाळायला हवेजीवनावश्यक वस्तूंची  खरेदी करण्यासाठी गेला तरी लक्ष्मणरेषा आखून थांबायला हवेशिस्त सोडून लोक गर्दी करु लागले तर मात्र मोठे संकट ओढवण्याची शक्यता

सोलापूर : जमावबंदीच्या काळात लोक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाच तर सर्वांचा खरेदीचा हक्क हिरावला जाण्याची शक्यता आहे. यावर तोडगा म्हणून अनेक भाजी विक्रेत्यांनी आणि दुकानदारांनी दुकानासमोर ‘लक्ष्मण रेषा’आखली आहे. ही रेषा पाळली तर सर्वकाही सुखकर होणार असल्याचा संदेश दिला जातोय. 

केंद्र शासनाने २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले; परंतु जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून शहरात लॉकडाऊन आहे. त्यात केंद्र सरकारकडून अचानक घोषणा होत असल्याने लोकांमध्ये संभ्रम आहे. बाहेर पडलेल्या लोकांना पोलीस अडवित आहेत. त्यातच मंगळवारी रात्री लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर दुकानांसमोर गर्दी झाली होती. बुधवारी सकाळी बाजार समिती, लक्ष्मी मार्केट, ७० फूट रोड भाजी मंडई परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासकीय अधिकारी चिंता व्यक्त करु लागले.

यादरम्यान, अकलूज, अक्कलकोट, मंद्रुप आणि सोलापुरातील मंगळवार पेठेसह विविध भागातील दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांनी दुकानासमोर तीन-तीन फूट अंतर राखून पांढºया रेषा आखल्याचे पाहायला मिळाले. लोकांनी पांढºया चौकोनात थांबून सुरक्षित अंतर राखल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी दुकानदार आणि ग्राहकांच्या या भूमिकेचे स्वागत केले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये असे वाटत असेल तर नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येणे टाळायला हवे. जीवनावश्यक वस्तूंची  खरेदी करण्यासाठी गेला तरी लक्ष्मणरेषा आखून थांबायला हवे. ही शिस्त कोरोनापासून बचाव करणार आहे. ही शिस्त सोडून लोक गर्दी करु लागले तर मात्र मोठे संकट ओढवण्याची शक्यता असल्याचे प्रशासकीय अधिकारी सांगत आहेत. 

या दुकानदारांचा आदर्श घ्या
- सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शिथिलता दिली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये भाजी विक्रेते आणि दुकानदारांनी दुकानासमोर रांगोळी, चुना, स्टीकरच्या सहाय्याने लक्ष्मणरेषा आखल्या आहेत. जिल्ह्यातील दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांनी याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

संपर्कात येणे टाळा
- कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये असे वाटत असेल तर नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येणे टाळायला हवे. जीवनावश्यक वस्तूंची  खरेदी करण्यासाठी गेला तरी लक्ष्मणरेषा आखून थांबायला हवे. ही शिस्त कोरोनापासून बचाव करणार आहे. ही शिस्त सोडून लोक गर्दी करु लागले तर मात्र मोठे संकट ओढवण्याची शक्यता असल्याचे प्रशासकीय अधिकारी सांगत आहेत.  

Web Title: If you follow the 'Laxman Rekha' then you will go home with a smile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.