रेशनकार्डधारकांच्या धान्य वाटपाकडे डोळेझाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:27 AM2021-08-14T04:27:07+5:302021-08-14T04:27:07+5:30
कोरोनाच्या संकटामुळे शासनाने सरसकट केशरी रेशन कार्डधारकांना दोन महिन्यांचे मोफत धान्य गहू व तांदूळ देऊ अशी घोषणा करूनही अद्याप ...
कोरोनाच्या संकटामुळे शासनाने सरसकट केशरी रेशन कार्डधारकांना दोन महिन्यांचे मोफत धान्य गहू व तांदूळ देऊ अशी घोषणा करूनही अद्याप सोलापूर जिल्ह्यात वाटप केलेले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना प्रत्यक्ष भेटून २ ऑगस्ट रोजी लेखी पत्र दिले होते; मात्र याची कोणतीही दखल न घेतल्याने १३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा संघटक युवराज घुले, शहराध्यक्ष हर्षद डोरले, लक्ष्मण गायकवाड, अर्जुन मुदगुल, संजय मुदगुल, रवी गोवे, कैलास कोळी, चंद्रशेखर राजमाने, समर्थ घुले, प्रभाकर शिंदे, सुनील मुढे, दादा वाघमोडे, विक्रम धावरे, सोमनाथ गायकवाड, जय कर्णीकर, हरिभाऊ घुले, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी ::::::::::::::::::
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलनप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, जिल्हा संघटक युवराज घुले, रवी गोवे आदी.
130821\img-20210813-wa0026-01.jpeg
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे जिल्हा संघटक युवराज घुले , रवी गोवे ज्येष्ठ नेते लक्ष्मण गायकवाड अर्जुन मुद्गुल संजय मुद्गुल दादा वाघमोडे विक्रम धावरे हरी भाऊ घुले समर्थ घुले प्रभाकर शिंदे सुनील मुढे सोमनाथ गायकवाड जय कर्णिकर आदी