भूखंड वाटपाच्या बनावट फायलीव्दारे हजारो एकर शासकीय जमीनीचे बेकायदेशीर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 05:14 PM2021-09-28T17:14:01+5:302021-09-28T17:14:41+5:30

सोलापूर जिल्हा पुनर्वसन अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याविरुद्ध किरीट सोमय्याकडे तक्रार 

Illegal allotment of thousands of acres of government land through fake allotment files | भूखंड वाटपाच्या बनावट फायलीव्दारे हजारो एकर शासकीय जमीनीचे बेकायदेशीर वाटप

भूखंड वाटपाच्या बनावट फायलीव्दारे हजारो एकर शासकीय जमीनीचे बेकायदेशीर वाटप

googlenewsNext

मंगळवेढा : मंगळवेढा शहरालगतचे भूखंड बेकायदेशीर रित्या वाटप करण्या बरोबर  जिल्हा पुनवर्सन अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी जुने आदेश दाखवून व  बनावट आदेश तयार करत जमीन व भूखंड वाटपाच्या  बनावट फायलीव्दारे हजारो एकर शासकीय जमीनीचे वाटप करण्यात आले आहे. चव्हाण यांच्या आजपर्यंतच्या सर्व कामाची चौकशी होवून कारवाई करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र हटकर समाज संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग चौगुले यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व माजी खासदार किरीट सोमय्या यांना निवेदनाद्वारे केली आहे.

 जिल्हा पुनवर्सन अधिकारी मोहिनी चव्हाण या सोलापूर येथे आल्यापासून ते आजतागायत शासकीय नियम पायदळी तुडवून बेकायदेशीररित्या जमीनीचे भूखंडाचे वाटप केले आहे. यासंदर्भात यापूर्वी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे तक्रार अर्ज देवून देखील अद्यापही कार्यवाही करण्यात आली नाही. जुने आदेश दाखवून व  बनावट आदेश तयार करत जमीन व भूखंड वाटपाच्या  बनावट फायलीव्दारे हजारो एकर शासकीय जमिनीचे वाटप केले. यात तक्रारीनंतर वाटप केलेले बरेचसे क्षेत्र रदद केले. फसवणूक झालेल्या अनेकांनी याबाबत न्यायालयात चव्हाण यांच्याविरोधात याचिका दाखल केल्या. मंगळवेढा शहरालगतचे भूखंड बेकायदेशीररित्या वाटप केले. देवडे ता पंढरपूर येथील भूखंड उजनी प्रकल्पग्रस्ताला राखीव असताना कोयना खातेदाराला शासकीय नियम डावलून बेकायदेशिरित्या वाटप केले.

याच जमीनीचे न्यायालयीन वाद विशेषता स्थगीती आदेश असताना जमीन खरेदी विक्री करणाग्रा एजंटाला हाताशी धरून जमिनीचे वाटप केले. या प्रकरणात जिल्हा पुनवर्सन अधिकारी यांच्यासह कार्यालयातील कर्मचायांनी संगणमतानी मोठ्या आर्थीक उलाढालीतून शासनाची फसवणूक करत मोठे नुकसान केले आहे. या सर्व बाबाची चौकशी स्वतंत्र समिती नेमून १ जानेवारी २०१५ पासून ते २० सप्टेबर २००१ पर्यंतच्या पुनर्वसन जमीन वाटपाच्या कामाची येत्या २० दिवसाच्या आत करावी, चौकशीत दोषी आढळणाऱ्या सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई  करावी, बेकायदेशीर कामे करणाऱ्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी चव्हाण यांच्यवर कारवाई न झाल्यास  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २० आॅक्टोबर रोजी संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा  निवेदनात दिला आहे .
......................................
सर्व कायदेशीर बाबी तपासून जमिनीचे  वाटप करण्यात आले आहे.तसेच जिल्हा पुनवर्सन अधिकारी पदावरून  माझी सध्या  बदली झाली आहे 
- मोहिनी चव्हाण, तत्कालीन जिल्हा पुनर्वसन अधिकारी, सोलापूर

 

Web Title: Illegal allotment of thousands of acres of government land through fake allotment files

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.