महिम येथे बेकायदेशीर हातभट्टी उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:23 AM2021-05-09T04:23:28+5:302021-05-09T04:23:28+5:30
महिम येथील कासाळ ओढ्यात अवैध हातभट्टी दारुच्या भट्ट्या सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व सांगोला ...
महिम येथील कासाळ ओढ्यात अवैध हातभट्टी दारुच्या भट्ट्या सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व सांगोला पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे सहा. फौजदार दत्तात्रय तोंडले, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल पवार, चालक पोलीस नाईक वाघमारे हे कारवाईसाठी गेले असता बाळू धोंडीबा चव्हाण हा पळून गेला. पोलिसांनी तेथून २० हजार रुपये किमतीचे २०० लिटर गूळ मिश्रित रसायन नष्ट केले.
सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक विकास क्षीरसागर, पोलीस नाईक अभिजित मोहोळकर यांना गणपत निवृत्ती बोडरे व दिलीप कृष्णा गायकवाड हे कासाळ ओढ्यात हातभट्टी दारूची भट्टी चालवित असल्याची बातमी मिळाली होती. यावेळी पोलिसांना पाहताच ते दोघेही पळून गेले. या कारवाईत ३६ हजार रुपये किमतीचे १२०० लिटर अशा तीन कारवाईत पोलिसांनी ५६ हजार रुपयांचे १४०० लिटर गूळ मिश्रित रसायन नष्ट केले.
याबाबत पोलीस नाईक अभिजीत साळुंखे, पोलीस नाईक विकास क्षीरसागर यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी बाळू धोंडीबा चव्हाण, गणपत निवृत्ती बोडरे (रा. महिम, ता.सांगोला), दिलीप कृष्णा गायकवाड (रा. सोनके, ता. पंढरपूर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.