सोलापूरात बेकायदेशीर हातभट्टीवर धाड, १३ हजार २०० लिटर रसायन नष्ट, दोघे ताब्यात

By admin | Published: April 4, 2017 02:44 PM2017-04-04T14:44:31+5:302017-04-04T14:44:31+5:30

.

Illegal mausoleum in Solapur, 13 thousand 200 liters of chemicals destroyed, both in possession | सोलापूरात बेकायदेशीर हातभट्टीवर धाड, १३ हजार २०० लिटर रसायन नष्ट, दोघे ताब्यात

सोलापूरात बेकायदेशीर हातभट्टीवर धाड, १३ हजार २०० लिटर रसायन नष्ट, दोघे ताब्यात

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ४ : गुळवंची तांडा (ता़ उ़ सोलापूर) येथील बेकायदेशीररित्या चालणाऱ्या हातभट्टीवर स्थानिक गुन्ह शाखेच्या पथकाने छापा मारला़ यात २ लाख ७७ हजार २०० रूपये किंमतीचा १३ हजार २०० लिटर गुळमिश्रित रसायन नष्ट करण्यात आले आहे़
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुळवंची तांडा येथे बेकायदेशीररित्या हातभट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती़ त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुळवंची तांडा येथील सरकारी तलावालगत व सुरेश राठोड यांच्या विटभट्टीवर छापा टाकला़ यावेळी बसवराज उमाजी राठोड व रमेश जिवला पवार हे दोघे बेकायदेशीरपणे हातभट्टी दारू तयार करण्यासाठी गुळमिश्रित रसायनाचा साठा बाळगत असलेल्या अवस्थेत सापडले़ त्या दोघांकडून २ लाख ७७ हजार २०० रूपये किंमतीचा १३ हजार २०० लिटर गुळमिश्रित रसायन मिळून आले व ते जागीच नष्ट केले़ या दोघांविरूध्द पोकॉ सचिन मागाडे व समीर खैरे यांनी फिर्याद दिली आहे़ सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
ही कारवाई पोलीस अधिक्षक एस विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली सहा़ पोलीस निरीक्षक उमेश धुमाळ, पोसई रियाज शेख, बाबुराव म्हेत्रे, पांडूरंग लांडगे, सचिन वाकडे, सर्जेराव बोबडे, संभाजी खरटमल, पोकॉ आसिफ शेख, सागर शिंदे, सचिन मागाडे, समीर खैरे, विजय भरले, संभाजी खरटमल, ईस्माईल शेख, दिपक जाधव यांनी बजावली आहे़

Web Title: Illegal mausoleum in Solapur, 13 thousand 200 liters of chemicals destroyed, both in possession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.