अवैध दारू विक्री, वाळू उपसा करणाऱ्या पाचजणांना हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:23 AM2021-07-29T04:23:53+5:302021-07-29T04:23:53+5:30
ग्यानबा दीपक धोत्रे (रा. जुनी वडार गल्ली, पंढरपूर) याच्यावर तीन वाळू चोरीचे गुन्हे दाखल असल्याने त्याला पंढरपूर, मोहोळ मंगळवेढा, ...
ग्यानबा दीपक धोत्रे (रा. जुनी वडार गल्ली, पंढरपूर) याच्यावर तीन वाळू चोरीचे गुन्हे दाखल असल्याने त्याला पंढरपूर, मोहोळ मंगळवेढा, सांगोला व माळशिरस तालुक्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. सिकंदर चंद्रकांत कोळेकर (रा. नेतपगाव, ता. पंढरपूर) याच्यावर वाळू चोरीचे तीन गुन्हे दाखल असल्याने त्याला पंढरपूर व मंगळेवढा तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. तानाजी कैलास खंडागळे (रा. उंबरगाव, ता. पंढरपूर) याच्यावर दारू विक्रीचे तीन गुन्हे दाखल असल्याने त्याला एक वर्षाकरिता पंढरपूर, मंगळेवढा व सांगोला तालुक्यांतून एक वर्षाकरिता हद्दपार केले आहे. समाधान सुखदेव ढवळे (रा. पिराची कुरोली, ता. पंढरपूर) याच्यावर अवैध वाळू विक्रीचे चार गुन्हे दाखल असून, त्यास पंढरपूर मंगळवेढा व माळाशिरस तालुक्यातून एका वर्षासाठी हद्दपार केले आहे.
आकाश रामदास शिंदे (रा. भंडीशेगाव, ता. पंढरपूर) याच्यावर दारू विक्रीचे व जबरी चोरीचे एकूण पाच गुन्हे दाखल असून, त्याला पंढरपूर, माळशिरस व सांगोला तालुक्यांतून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.