अवैध वाळू उपसा; ६ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:32 AM2021-02-26T04:32:15+5:302021-02-26T04:32:15+5:30
कुमठे येथे बोटीद्वारे विनापरवाना वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पथकाला मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाच्या पोलिसांनी अचानक ...
कुमठे येथे बोटीद्वारे विनापरवाना वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पथकाला मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाच्या पोलिसांनी अचानक धाड टाकली असता एक केशरी रंगाची वाळू काढण्यासाठी वापरण्यात येत असलेले जिलेटीन बोटी, इंजीन, पाईपलाईनसाठी वापरलेले पाईप, काही पाईप पाण्यात सोडलेले, बाजूस ॲसिड बॅटऱ्या, एक डिझेल कॅन्ड हे साहित्य मिळून आले. ११ हजार रुपये किमतीचे २२ लोखंडी बॅरेल, त्याचे लोखंडी पाईप जोडण्यासाठी लागत असलेले गोल रिंगाचे पट्ट्या, १३ लोखंडी १५ फुटी ६ इंची गोल पाईप जोडण्यासाठी लागणारे गोल रिंगचे पाईप असे एकूण ३ लाख, ३७ हजार रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी इस्माईल शेख (वय-३९ रा. महबतूला साहेबगंज, राज्य झारखंड), फारुख शेख (वय-३४ वर्ष) शेखर कोळी, राजप्पा कोळी, मस्तान अत्तार, शिवानंद पाटील सर्व (रा. कुमठे ता. अक्कलकोट) या सहा जणांना संशयिताविरुद्ध रॉयल्टी न भरता, शासनाचे विना परवानगीने वाळू उपसा केल्याबद्दल पर्यावरण कायद्यानुसार ३७९ प्रमाणे अक्कलकोट येथील दक्षिण पोलीस ठाण्यात विशेष पथकातील सतीश एनगुले यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड हे करीत आहेत.